पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आता कोरोना चाचणी बंधकारक
सोलापूर - 02-Apr, 2021, 12:00 AM
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घ्यायचं असेल तर दर्शनाला जाण्यापूर्वी प्रत्येक विठ्ठलभक्ताला आता करोना टेस्ट करावी लागणार आहे.
तसा निर्णय पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे. हा नियम 5 एप्रिलपासून लागू होणार आहे.
सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाला येणार्या भाविकांच्या चेहर्यावर मास्क आणि हातावर सॅनिटायझर फवारणी बंधनकारक करण्यात आली आहे. पण राज्यात सध्या कोरोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे.
राज्यातल्या कोरोना संसर्ग असलेल्या पहिल्या 10 शहरामध्ये सोलापूरचे नाव आले आहे. यामुळे यापुढे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
राज्यात दिवसागणिक आकडे वाढत चालले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 5 हजार 985 आणि शहरात 16 हजार 391 इतके बाधित रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
त्यामुळं कोरोनाच्या या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तातडीने कोरोना चाचणीचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार येत्या 5 एप्रिलपासून कोरोना चाचणी झाल्यावरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी मंदिराच्या समोरच संत ज्ञानेश्वर सभामंडपात भाविकांच्या अँटीजेन टेस्टची व्यवस्था केली जाणार आहे.
PMYQDTgnoGOZF