पाथर्डी । वीरभूमी- 04-Apr, 2021, 12:00 AM
शनिवार दि. 3 रोजी पाथर्डी तालुक्यात तब्बल 82 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याबरोबर पाथर्डी तालुक्यातही बाधित मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी तब्बल 82 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे यांनी दिली आहे.
यामध्ये पाथर्डी शहरातील नवी पेठ 01, कसबा 04, ब्राम्हणगल्ली 01, वामनभाऊनगर 01, एडके कॉलनी 01, खंडोबामाळ 01, चांदगावरोड 02, विजयनगर 02, शंकरनगर 01, नाथनगर 01, हंडाळवाडी 02, शिक्षक कॉलनी 02 असे कोरोना बाधित आढळले.
तर ग्रामीण भागातील माळी बाभूळगाव 01, अकोला 01, धायतडकवाडी 02, दुलेचांदगाव 01, निपाणी जळगाव 01, भुतेटाकळी 02, येळी 08, मिडसांगवी 01, चितळवाडी 01, सोमठाणे 03, मालेवाडी 01, कारेगाव 03, केळवंडी 01, करोडी 03, भिलवडे 02,
पिंपळगाव टप्पा 01, खांडगाव 02, सातवड 01, करंजी 07, डमाळवाडी 01, शिराळ 04, लोहसर 03, कडगाव 01, मिरी 01, डोंगरवाडी 02, मोहोज बुद्रुक 03, मोहज 02, मांडावा 01, निवडुंगे 01, तिसगाव 01 तर शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमित मास्कचा वापर करावा,
सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments