केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून तीन महामार्गासाठी मोठा निधी
मुंबई । वीरभूमी- 04-Apr, 2021, 12:00 AM
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील तीन महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी व पूल बांधणीसाठी तब्बल 63 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आपल्या ट्वीटरवरून दिली आहे.
या कामांमध्ये पनवेल ते महाड पंजिम. रस्ता विभागातील मुख्य पूल बांधणी, सिन्नर -घोटी - त्रिंबकेश्वर - पालघर मार्ग व पेठनाका - सांगली - मिरज या रोडच्या मजबुतीकरणाचा समावेश आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक महत्वाच्या मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. राज्यातील रस्त्याचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी गडकरींनी या निधीची घोषणा केली आहे.
रस्ताची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 2 हजार 780 कोटी रुपयांचा निधी गडकरींनी महाराष्ट्रासाठी देऊ केला आहे.रस्ता
या निधीतून आज तब्बल 63 कोटी 63 लाख रुपये खर्चाच्या कामांची घोषणा केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चोरडी नदीवरील महामार्ग क्र. 66 वर पनवेल ते महाड या रस्त्यावरील मुख्य पूल बांधणी कामासाठी 29.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.रस्ता
तसेच सिन्नर- घोटी- त्रिंबकेश्वर- जवाहर - पालघर हा नॅशनल हायवे 160 च्या मजबुतीकरणासाठी 11 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.रस्ता
त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्र. 166 पेठनाका - सांगली - मिरज या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 22 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ता
नितीन गडकरी यांनी ट्वीटरवरुन देशातील विविध महामार्गांच्या कामांची घोषणा केली. #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली गडकरी यांनी राष्ट्रीय आणि राज्यमार्गांच्या कामाबाबत घोषणा केल्या आहेत.
RnbQyLgqNv