खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुरवठ्याला यश
अहमदनगर । वीरभूमी- 06-Apr, 2021, 12:00 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला आहे.
यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर - मिरजगाव- करमाळा ते घोगरगाव (राष्ट्रीय महामार्ग 561ए) 38 कि.मी साठी 980 कोटी, दुसर्या टप्पयासाठी घोगरगाव - अहमदनगर जिल्हा हद्द (राष्ट्रीय महामार्ग 561ए) 42 कि.मी. साठी 1032 कोटी निधी मंजूर झाला असून सदर रस्ता चौपदरीकरण होणार आहे. त्यासाठी भरघोस निधीची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील आढळगाव ते जामखेड (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 ) 63 कि.मी. रस्त्यासाठी सुमारे जवळपास 400 कोटी निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केलेल्या पाठपुरव्याला यश मिळाले.
अहमदनगर येथील उड्डाणपूल, नगर शिर्डी रस्ता या बरोबरच कर्जत-जामखेड या तालुक्यांमध्ये च्या दृष्टीने महत्त्वाचा असणार न्हवरा फाटा जामखेड टप्पा 2 या रस्त्याच्या कामसंदर्भात मागील काही आठवड्यात केंद्रीय वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्री महोदय ह्यांच्या संपर्कात राहून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून आणला.
न्हवरा फाटा ते श्रीगोंदा काष्टी टप्पा 1 कामाची मंजुरी मिळालेली आहे. त्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असून ते काम प्रगतिपथावर आहे . आता केंद्रीय वाहतूक रस्ते महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी भाग 2 ची मंजुरी दिल्यामुळे आढळगाव ते जामखेड या कामाची लवकरच सुरुवात होईल अपेक्षा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग साठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे आपण अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो.
प्रगतीचा हायवे अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्ती पर्यंत पोहोचेल असे देखील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.
OrxlPGVJ