अहमदनगर । वीरभूमी - 08-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसाआड नवे रेकॉर्ड करत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा घटलेला असतांना आज पुन्हा नव्याने रेकॉर्ड करत आज गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 2233 कोरोना बाधित आढळले आहेत.
शासनाच्यावतीने दोन दिवसापासून मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी आकडेवारी कमी आली होती. आज तिसर्या दिवशी पुन्हा बाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू.
वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी आज 611 असून दुसर्या क्रमांकावर कर्जतने 201 चा आकडा गाठत दुसरा क्रमांक राखला आहे. त्या खालोखाल संगमनेर 198, नगर ग्रामीण 187, अकोले 128, राहाता 117, पाथर्डी 114, राहुरी 107, शेवगाव 103, कोपरगाव 99, श्रीरामपूर 79, पारनेर 70, नेवासा 55, भिंगार कन्टेन्मेंट 54, जामखेड 47, श्रीगोंदा 40, इतर जिल्हा 17, मिलट्री हॉस्पिटल 06 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आज गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 859, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 549 आणि अँटीजेन चाचणीत 825 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 271, कर्जत 37, संगमनेर 151, नगर ग्रामीण 36, अकोले 103, राहाता 10, पाथर्डी 27, राहुरी 07, शेवगाव 26, कोपरगाव 64, पारनेर 38, नेवासा 12, भिंगार कन्टेन्मेंट 38, जामखेड 08, श्रीगोंदा 21, इतर जिल्हा 02, मिलट्री हॉस्पिटल 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 202, कर्जत 04, संगमनेर 44, नगर ग्रामीण 39, अकोले 09, राहाता 84, पाथर्डी 22, राहुरी 07, शेवगाव 26, कोपरगाव 29, श्रीरामपूर 47, पारनेर 08, नेवासा 05, भिंगार कन्टेन्मेंट 04, जामखेड 03, श्रीगोंदा 06, इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 825 जण बाधित आढळून आले. मनपा 138, कर्जत 160, संगमनेर 03, नगर ग्रामीण 112, अकोले 16, राहाता 23, पाथर्डी 63, राहुरी 93, शेवगाव 51, कोपरगाव 06, श्रीरामपूर 32, पारनेर 24, नेवासा 38, भिंगार कन्टेन्मेंट 12, जामखेड 36, श्रीगोंदा 13, इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
skNFwvIxaRYmVdo