कोरोना लस घ्या, टॅग लाईन द्या अन् मिळवा 5 हजार रुपये
मुंबई । वीरभूमी- 08-Apr, 2021, 12:00 AM
कोरोना लसीकरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांचा कल वाढावा तसेच जनजागृती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने एक बक्षिस योजना आणली आहे. या योजनेत प्रत्येक व्यक्ती सहभाग घेऊ शकते.
तुम्ही फक्त एवढंच करायचे आहे की, कोरोना लस घेतांना फोटो काढायचा आहे. आणि लसीकरणाचे महत्व सांगणारी छोटीसी टॅगलाईन द्यायची आहे. यातून प्रत्येक महिण्याला 10 विजेत्यांना 5 हजार रुपये बक्षिस म्हणुन मिळणार आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे मोदी सरकारने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. जास्तीत जास्त लोकांचं कोरोना लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहीत केलं जातं आहे.
शक्य त्या मार्गाने जनजागृती करण्यात येत आहे. काही नेतेमंडळी स्वत: कोरोना लस घेत आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लसीकरणाच्या बदल्यात लोकांना काही ना काही दिलं जात आहे. आता तर मोदी सरकारनेही देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. कोरोना लस घेणार्याला मोदी सरकार 5 हजार रुपये देणार आहे.
केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणार्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागेल.
कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्याला लसीकरणाचं महत्त्वं सांगणारी एक छानशी टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल.
तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर तिथं लॉग इन करावं लागेल. तुम्हाला mygov.in लॉग इन आयडीसह, ओटीपीमार्फत किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटमार्फतही लॉग इन करण्याची सुविधा आहे. तिथं तुम्हाला आवश्यक ती माहिती भरू तुमची एंट्री पाठवा. तिथं तुमचा हा फोटो आणि टॅगलाइन पाठवा.
सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल.
अशा 10 विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना दर महिन्याला 5000 रुपये दिले जातील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2021 पर्यंतची मुदत आहे.
Comments