माऊली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सचिन घोरतळे यांचे आवाहन
बोधेगाव । उद्धव देशमुख- 08-Apr, 2021, 12:00 AM
देशात कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना रुग्णवाढीचा गुणाकार होऊ नये म्हणुन खबरदारी म्हणून राज्य शासनाने काही निर्बंधासह मिनी लॉकडाउन केले आहे. घरी असलेल्या प्रत्येक नागरिकाने कोरोनाला विरोध करत असतांना चारा-पाण्यासाठी उन्हात दाहीदिशा फिरत असलेल्या पक्ष्याकरीता मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान बोधेगाव येथिल माऊली प्रतिष्ठानकडुन चिमणी- पाखरं पाणवठा उपक्रम सुरु करण्यात आला असून सदरील उपक्रमांची तालुक्यातील घराघरातून सुरुवात केल्यास पक्ष्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन त्यांना जीवनदान मिळणार आहे.
सध्या असलेल्या या तीव्र उन्हात पशू-पक्ष्यांना जीवन जगण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाळीव-प्राण्यांचा चारा -पाण्याचा प्रश्न व्यक्तीद्वारे सोडवला जातो. परंतु पक्ष्यांचा प्रश्न मात्र भयानक स्वरूप धारण करत आहे. यासाठी ‘चिमणी पखरं पाणवठा असा अनोखा उपक्रम माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन घोरतळे यांनी सर्वाना प्रेरणा मिळावी म्हणून घरीच राबवला आहे.
माऊली प्रतिष्ठानकडुन दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मागील वर्षी प्रतिष्ठाणने ‘एक ओंजळ पक्ष्यासाठी’ या उपक्रमातुन शाळा कॉलेजच्या सहभागातुन शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला होता.
दरम्यान यावर्षी देखील कोविडच्या प्रादुर्भावाचा सामना करत या उन्हाळ्यात पक्ष्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने मनुष्य प्राणी उन्हापासुन वाचवण्याचा प्रयत्न करणार परंतु पक्ष्यांचे काय? या विचाराने प्रेरित होउन फुल न फुलाची पाकळी म्हणून गावातील एकबुरजी वस्तीत घरा- घरातील मुलांना एकत्र करत चिमणी पखरं ‘पाणवठा या उपक्रमा अंतर्गत’ झाड झुडपे, छप्पर, माळवद, स्लॅप आशा वेगवेगळ्या ठिकाणी घरी प्लॅस्टीकच्या टोपल्यात पाण्याची आणि माळवद, स्लॅप तसेच झुडुपाच्या सावलीला धान्य टाकुन पक्ष्यांच्या चारा पाण्याची सोय करण्यात आली आहे.
हा उपक्रम माऊली प्रतिष्ठानचे सचिव सोपान घोरतळे यांच्या नियोजना खाली राबविला जात असून गौतम कासुळे, अमोल ढगे, सुरज घोरतळे, अशोक घोरतळे, किरण काशिद आदींनी घरातील मुलांच्या सहाय्याने या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.
या उन्हाळ्यात पक्ष्यांचे चारा-पाण्यासाठी हाल होउ नये, याकरीता आम्ही चिमणी-पाखरं पाणवठा. हा उपक्रम घरीच हाती घेतला असून या उपक्रमासाठी तालुक्यातुन घरच्या घरी नागरिकांनी पुढाकार घेत पक्ष्यांच्या चारा पाण्याची माणुसकीच्या नात्याने विचार केल्यास चारा- पाण्यामुळे होणारे पक्ष्यांचे मृत्यू कमी होणार आहेत, असे आवाहन माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन घोरतळे यांनी केले आहे.
cdlUxXun