श्रीगोंदा । वीरभूमी - 11-Apr, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात रविवार दि.११ रोजी घेतलेल्या ४१६ रॅपिड अँटीजन चाचण्यात ७२ रुग्ण संक्रमित आढळले तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात १५ पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण ८७ जण कोरोना बाधित सापडले.
आत्तापर्यंत एकूण रुग्णांच्या संख्येने ४,००० आकडा गाठला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४३८ आहे. कोविड केंद्रात ९५ जण उपचार घेत आहेत.
खाजगी हॉस्पिटलमध्ये १५७ जण तर ग्रामीण रुग्णालयात २२ जण उपचार घेत आहेत. १६४ जण घरीच विलगिकरनात आहेत. रविवारी ५३ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. महामारी आल्यापासून ४५ जण मृत्युमुखी पडले आहेत.
रविवार दि.११ रोजी श्रीगोंदा शहरात २१ जण पॉझिटिव्ह आले तर ग्रामीण भागात काष्टी-१६, मढेवडगाव -३, बेलवंडी बुद्रुक-५, पिंपळगाव पिसा-६, श्रीगोंदा कारखाना-३, आढळगाव-२, मुंगूसगाव-३, शिरसगाव-२, उक्कडगाव-१, येळपणे-१, खरातवाडी-१, देऊळगाव-१, कोरेगव्हाण-१, लिंपणगाव-१, सुरेगाव-१, घारगाव-२, बनपिंप्री-१,
देवदैठण-२, हिंगणी-१, विसापूर-१, वेळू-१, कामठी-१, चिंभळा-१, कोसेगव्हाण-१, पेडगाव-१, खांडगाव-१, वांगदरी-१, पारगाव सुद्रीक-१ तर हंगेवाडी येथे १ जण पॉझिटिव्ह आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
Comments