जिल्हातील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या घरात
कर्जत 222, पाथर्डी 134, राहुरी 128, शेवगाव 105, संगमनेर 111
अहमदनगर । वीरभूमी - 12-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिल्यानंतरही आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या घरात आहे. आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत 1998 ने भर पडली आहे.काल रविवारी जिल्ह्यातील 1617 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आज 1998 कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या 1 लाख 18 हजार 045 एवढी झाली असून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 907 एवढी झाली आहे.
शनिवारी व रविवारी जिल्ह्यात सर्वत्र कडक विकेंड लॉकडाऊन पाळला गेला. मात्र कोरोना बाधितांची आकडेवारी आजही दोन हजाराच्या घरात आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी घटली असून ती 382 वर आली आहे. मात्र कर्जतने पुन्हा दुसरा क्रमांक पटकावत 222 चा आकडा गाठला आहे.
त्याचप्रमाणे नगर ग्रामीण 150, पाथर्डी 134, राहुरी 128, श्रीरामपूर 127, राहाता 124, संगमनेर 111, शेवगाव 105, पारनेर 86, श्रीगोंदा 86, अकोले 82, नेवासा 82, जामखेड 73, कोपरगाव 63, इतर जिल्हा 21, भिंगार कन्टेन्मेंट 19, इतर जिल्हा 02, मिलट्री हॉस्पिटल 01 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 657, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 337 आणि अँटीजेन चाचणीत 1004 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 218, कर्जत 79, नगर ग्रामीण 41, पाथर्डी 23, राहुरी 09, श्रीरामपूर 37, राहाता 19, संगमनेर 67, शेवगाव 15, पारनेर 38, श्रीगोंदा 19, नेवासा 08, जामखेड 67, कोपरगाव 01, इतर जिल्हा 02, भिंगार कन्टेन्मेंट 13, मिलट्री हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 98, कर्जत 03, नगर ग्रामीण 22, पाथर्डी 06, राहुरी 14, श्रीरामपूर 31, राहाता 74, संगमनेर 23, शेवगाव 02, पारनेर 04, श्रीगोंदा 05, अकोले 11, नेवासा 09, जामखेड 04, कोपरगाव 11, इतर जिल्हा 14, भिंगार कन्टेन्मेंट 04, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1004 जण बाधित आढळून आले. मनपा 66, कर्जत 140, नगर ग्रामीण 87, पाथर्डी 105, राहुरी 105, श्रीरामपूर 59, राहाता 31, संगमनेर 21, शेवगाव 88, पारनेर 44, श्रीगोंदा 62, अकोले 71, नेवासा 65, जामखेड 02, कोपरगाव 51, इतर जिल्हा 05, भिंगार कन्टेन्मेंट 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर काल रविवारी 1617 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये मनपा 491, अकोले 39, जामखेड 08, कर्जत 97, कोपरगाव 77, नगर ग्रामीण 98, नेवासा 51, पारनेर 31, पाथर्डी 52, राहाता 190, राहुरी 126, संगमनेर 98, शेवगाव 27, श्रीगोंदा 45, श्रीरामपूर 105, कॅन्टोन्मेंट 61, इतर जिल्हा 20 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
Comments