श्रीगोंदा । वीरभूमी - 12-Apr, 2021, 12:00 AM
विकेंड लॉकडाऊन नंतरच्या सोमवार दि.१२ रोजी दोघा जनांचा कोरोनामूळे मृत्यू झाला. त्यातील पारनेर येथून पारगाव येथील पाहुण्यांकडे आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू टाकळी लोणार येथील ६५ वर्षांच्या महिलेचा बळी गेला.
घेतलेल्या ५७५ रॅपिड अँटीजन चाचण्यात १२५ जण संक्रमित आले. गेले दोन दिवस घशातील स्रावांचे किट शिल्लक नसल्याने आरटीपीसीआर चाचण्या झाल्या नाहीत.
सोमवारी उशिरा १५० आरटीपीसीआर किट आल्याने मंगळवारी संशयित रुग्णांच्या चाचण्या होणार आहेत. नगर येथून आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत २३ जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी तब्बल १४८ जण संक्रमित आढळले. यात ५९ महिला तर ८९ पुरुष रुग्ण आहेत.
आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४,१४८ झाली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ४७ झाली आहे. सद्यस्थितीला ५१३ रुग्ण सक्रिय आहेत.कोविड केंद्रात ९८, ग्रामीण रुग्णालयात २३,खाजगी हॉस्पिटलमध्ये १८२ जण उपचार घेत आहेत तर २१० जण घरीच विलगिकरणात आहेत.
सोमवार दि.१२ रोजी श्रीगोंदा शहरात १७ जण संक्रमित आढळले तर ग्रामीण भागात बेलवंडी बुद्रुक-११, मुंगूसगाव-११, काष्टी-१०, पिंपळगाव पिसा-७, घारगाव-७, कोळगाव-६, निंबवी-५, पारगाव सुद्रीक-५, आढळगाव-५, एरंडोली-४, तांदळी दुमाला-३, विसापूर-२, कोरेगव्हाण-२, मांडवगण-२, बनपिंप्री-२, भानगाव-३, टाकळीकडेवळीत-२, टाकळी लोणार-२, हिरडगाव-१, सांगवी-२, लिंपणगाव-३, घुटेवाडी-२, आनंदवाडी-२,
शेडगाव-१, चांडगाव-१, ढोकराई-१, कामठी-१, घोगरगाव-२, वांगदरी-२, मुंढेकरवाडी-१, रुईखेल-१, खांडगाव-१,सुरोडी-२, लोणी व्यंकनाथ-४, म्हातारपिंप्री-१, चिंभळा-२, पिंप्रीकोलंदर-१, ढवळगाव-२, उक्कडगाव-१,
पेडगाव-१, माठ-१, बाबुर्डी-१, हंगेवाडी-१, सुरेगाव-१, अजनुज-१ तर देवदैठण येथे १ रुग्ण संक्रमित आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
sTQrFMgBOaCx