सुगाव खुर्द येथे बुधवारपासून कोरोना लसीकरण
अकोले । वीरभूमी- 12-Apr, 2021, 12:00 AM
तालुक्यातील सुगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर बुधवार दि. 14 एप्रिल रोजी नागरिकांसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत कोव्हीड लसीकरण होणार असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ. श्याम शेटे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, हे लसीकरण 45 वर्षे व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींसाठी असून 45 वर्षं वयोगटा खालील व्यक्तींसाठी लसीकरण केले जाणार नाही, तसे आदेश शासनाकडून आलेले नाहीत. त्यामुळे कोणीही वाद घालू नय, असे म्हटले आहे.
तसेच आजारी व्यक्तींनी किंवा पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व पॉझिटीव्ह असाल तर लस घेऊ नये किंवा आजारी व्यक्तींनी (थंडी, ताप, खोकला, अंगदुखी, धाप लागणे, अशक्तपणा) असलेल्या व्यक्तींनी बरे होईपर्यंत लस घेऊ नये. तर कोव्हीड टेस्ट करून उपचार घ्यावेत.
लस घेण्यासाठी येणार्या व्यक्तींनी मास्क घालणे बंधनकारक आहे. त्याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊ नये. लस घेण्यासाठी आधार कार्ड व मोबाइल नंबर आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय कुणालाही लस दिली जाणार नाही, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.
स्पॉट रजिस्ट्रेशन केले जाते किंवा नागरिकानी स्वतः आपल्या मोबाइल वरून नोंदणी करून सेंटर म्हाळदेवी निवडावे. त्याच आय.डी.वरून सुगाव खुर्द येथे लसीकरण केले जाते. लस घेण्यासाठी येताना जेवण करून यावे. आणि खूप महत्वाचे म्हणजे आरोग्य केंद्रात खूप गर्दी होत असल्याने सर्वांनी योग्य अंतर पाळणे (सोशल डिस्टन्सिंग) बंधनकारक आहे. हे सर्व नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने शासनाने लागू केलेले नियम आहेत.
त्यामुळे कोणीही हे नियम मोडू नये, अन्यथा पोलीस प्रशासनास पाचारण करावे लागेल किंवा लसीकरण सत्र बंद करावे लागेल. याची सर्वानी नोंद घ्यावी. त्यामुळे कृपया स्वतःची काळजी म्हणून तरी सर्व नियम पाळून लस घ्यावी व सर्व नागरिकांनी आरोग्य कर्मचार्यांना सहकार्य करावे असे आवाहन सुगार खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम शेटे यांनी केले आहे.
tbnmXWpujFdA