अहमदनगर । वीरभूमी - 14-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आज जिल्ह्यात तब्बल 2405 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये खाजगी व जिल्हा रुग्णालयाच्या चाचणीत 1073 तर अँटीजेन चाचणीमध्ये तब्बल 1332 कोरोना बाधित आढळून आले.
आज रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आजही कोरोना बाधितांचा आकडा 2 हजार 400 च्या पार गेला आहे.
नगर शहराचा आकडा 494 वर गेला असून कोपरगाव 289, कर्जत 279 तर राहाता 184, पाथर्डी 177, शेवगाव 168, संगमनेर 136, अकोले 126, पारनेर 121, राहुरी 117, नगर ग्रामीण 88, श्रीरामपूर 66, श्रीगोंदा 52, नेवासा 47, भिंगार कन्टेंन्मेंट 40, इतर जिल्हा 11, जामखेड 09, मिलट्री हॉस्पिटल 01 असे रुग्ण आढळले आहेत.
आज बुधवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत 0405 ने भर पडली आहे. काल मंगळवारी जिल्ह्यातील 1352 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
आज बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 556, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 517 आणि अँटीजेन चाचणीत 1332 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 147, कोपरगाव 53, कर्जत 104, राहाता 31, पाथर्डी 18, शेवगाव 65, संगमनेर 03, अकोले 35, पारनेर 26, राहुरी 15, नगर ग्रामीण 05, श्रीरामपूर 04, श्रीगोंदा 01, नेवासा 21, भिंगार कन्टेंन्मेंट 23, इतर जिल्हा 02, जामखेड 02, मिलिटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 196, कोपरगाव 21, राहाता 96, पाथर्डी 04, शेवगाव 04, संगमनेर 88, अकोले 07, पारनेर 10, राहुरी 12, नगर ग्रामीण 28, श्रीरामपूर 17, श्रीगोंदा 15, नेवासा 02, भिंगार कन्टेंन्मेंट 13, इतर जिल्हा 03, जामखेड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1332 जण बाधित आढळून आले. मनपा 151, कोपरगाव 215, कर्जत 175, राहाता 57, पाथर्डी 155, शेवगाव 99, संगमनेर 45, अकोले 84, पारनेर 85, राहुरी 90, नगर ग्रामीण 55, श्रीरामपूर 45, श्रीगोंदा 36, नेवासा 24, भिंगार कन्टेंन्मेंट 04, इतर जिल्हा 06, जामखेड 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर काल मंगळवारी 1352 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 568, अकोले 52, जामखेड 02, कर्जत 02, कोपरगाव 61, नगर ग्रामीण 90, नेवासा 17, पारनेर 10, पाथर्डी 45, राहाता 195, राहुरी 77, संगमनेर 97, शेवगाव 20, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 75, कॅन्टोन्मेंट 24 आणि मिलिटरी हॉस्पिटल 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
VfpZNiwYBlKAvU