बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी
संगमनेर । वीरभूमी - 15-Apr, 2021, 12:00 AM
शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक दोघा युवकांवर हल्ला करत जखमी केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेने परिसरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर मधील नान्नज दुमाला शिवारातील चत्तर व पाटोळे वस्ती येथे काही नागरिकांना बिबट्या दिसला. त्यामुळे बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी उपसरपंच सोमनाथ चत्तर यांच्यासह ग्रामस्थ गेले होते.
त्याचवेळी मकाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऋषीकेश रावसाहेब पाटोळे (वय 22) व ओंकार विलास पाटोळे (वय 17) या दोघा युवकांवर हल्ला केला.
जखमींना तळेगाव दिघे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
Hello