आज नगर जिल्ह्यातील डिस्चार्ज रुग्णांचेही रेकॉर्ड
अहमदनगर । वीरभूमी- 22-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात आज गुरुवारी 3176 कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी रेकॉर्ड करत तब्बल 3065 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 24 हजार 690 इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.00 टक्के इतके झाले आहे. यामुळे सध्या उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 22 हजार 068 इतकी झाली आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज डिस्चार्ज रुग्णांनीही रेकॉर्ड केले आहे. आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 657, अकोले 146, जामखेड 79, कर्जत 190, कोपरगाव 177, नगर ग्रामीण 167, नेवासा 131, पारनेर 132, पाथर्डी 195, राहाता 352, राहुरी 106, संगमनेर 267, शेवगाव 114, श्रीगोंदा 105, श्रीरामपूर 165, कॅन्टोन्मेंट 42, मिलिटरी हॉस्पिटल 10 आणि इतर जिल्हा 27 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या तब्बल 1 लाख 24 हजार 690 वर पोहोचली आहे. तर सध्या 22 हजार 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 1688 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे.
नागरिकांनी कोरोना विषयी असलेली भिती दूर करून धाडसाने उपचार करून घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो हे या आकडेवारेतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घ्यावेत, नियमित मास्क वापरावा व शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
uOdMnomqHtwAVF