नगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना विस्फोट
आज आढळले 3790 कोरोना बाधित
अहमदनगर । वीरभूमी - 23-Apr, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतांनाही बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा एक दिवस कमी तर एक दिवस जादा असा पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात 3790 कोरोना बाधित आढळले आहेत.जामखेड तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यात कोरोना विस्फोट झाला आहे. नगर शहरासह नगर ग्रामीण, राहाता 300 शे पार, कर्जत, अकोले, संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर 200 पार तर इतर तालुके शंभरी पार आहे.
दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील परिस्थित कठीण बनत चालली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाहीत, रेमडिसीवीर औषध मिळत नाहीत. तर काही भागात बेड मिळत नसल्याचे चित्र आहे.
यावर उपाय म्हणुन नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग आपण रोखू शकू. मात्र अनेकजन नियमाचे पालन करत नसून बेजबाबदारपणे वागत आहेत.
मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा बेजबाबदार नागरिकांमुळे वाढताच आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात 3790 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 861, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1062 तर अँटीजेन चाचणीत 1867 असे 3790 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 887 वर गेला असून नगर ग्रामीण 342, राहाता 302, कर्जत 293, अकोले 233, संगमनेर 217, राहुरी 216, श्रीरामपूर 200, भिंगार कन्टेंमेंट 166, पारनेर 156, कोपरगाव 146, शेवगाव 121, नेवासा 120, श्रीगोंदा 109, इतर जिल्हा 108, पाथर्डी 107, जामखेड 55, मिलटरी हॉस्पिटल 09, इतर राज्य 03 असे रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 110, नगर ग्रामीण 15, राहाता 43, कर्जत 85, अकोले 151, संगमनेर 76, राहुरी 39, श्रीरामपूर 03, भिंगार कन्टेंमेंट 90, पारनेर 62, कोपरगाव 24, शेवगाव 78, नेवासा 01, श्रीगोंदा 31, इतर जिल्हा 04, पाथर्डी 15, जामखेड 25, मिलटरी हॉस्पिटल 09 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 426, नगर ग्रामीण 87, राहाता 107, कर्जत 02, अकोले 19, संगमनेर 70, राहुरी 38, श्रीरामपूर 74, भिंगार कन्टेंमेंट 22, पारनेर 18, कोपरगाव 64, शेवगाव 04, नेवासा 21, श्रीगोंदा 05, इतर जिल्हा 89, पाथर्डी 07, जामखेड 06, इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1867 जण बाधित आढळून आले. मनपा 351, नगर ग्रामीण 240, राहाता 152, कर्जत 206, अकोले 63, संगमनेर 71, राहुरी 139, श्रीरामपूर 123, भिंगार कन्टेंमेंट 54, पारनेर 76, कोपरगाव 58, शेवगाव 39, नेवासा 98, श्रीगोंदा 73, इतर जिल्हा 15, पाथर्डी 85, जामखेड 24 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments