अहमदनगर । वीरभूमी- 24-Apr, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा काही केल्या थांबत नसून तो दररोज थोड्या फार फरकाने वाढतच आहे. आज रविवारी शनिवारच्या तुलनेत बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली. मात्र हा आकडा 3493 एवढा असल्याने नगरकरांची चिंता कायम आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध, विकेंड लॉकडाऊन असतांनाही कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा एक दिवस कमी तर एक दिवस जादा असा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. आज रविवारी जिल्ह्यात 3493 कोरोना बाधित आढळले आहेत.
नगर शहराबरोबरच राहाता तालुका आता 401 पार गेला असून नगर ग्रामीण 350 पार गेला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले व पाथर्डीचा आकडा शंभरच्या आत आहे. मात्र इतर तालुक्यातील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील परिस्थित कठीण बनत चालली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाहीत, रेमडिसीवीर औषध मिळत नाहीत. तर काही भागात बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणुन नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग आपण रोखू शकू. मात्र अनेकजन नियमाचे पालन करत नसून बेजबाबदारपणे वागत आहेत.
आज रविवारी जिल्ह्यात 3493 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 850, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1056 तर अँटीजेन चाचणीत 1587 असे 3493 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 915 वर गेला असून राहाता 401, नगर ग्रामीण 350, कर्जत 252, शेवगाव 208, पारनेर 160, जामखेड 154, राहुरी 154, नेवासा 140, कोपरगाव 131, संगमनेर 121, श्रीगोंदा 115, श्रीरामपूर 113, पाथर्डी 98, भिंगार कन्टेंन्मेंट 96, इतर जिल्हक 43, अकोले 41, इतर राज्य 01 असे रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
SnNaHOQgDuVvyEF