अहमदनगर । वीरभूमी - 28-Apr, 2021, 12:00 AM
आज नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. आज बुधवारी जिल्ह्यात 3122 कोरोना बाधित आढळले असून अनेक ठिकाणचा आकडा वाढला आहे तर काही ठिकाणचा आकडा घटला आहे.
दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांना गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली होती. मात्र आज बुधवारी पुन्हा कोरोना बाधितांची संख्या 3122 वर गेला आहे.
वाढत्या कोरोना बाधिातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग साखळी तोडू शकतो. मात्र नागरिकांमधून कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
आज बुधवारी जिल्ह्यात 3122 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1067, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1178 तर अँटीजेन चाचणीत 877 असे 3122 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 583 वर आला असून राहाता 304, पारनेर 300, नगर ग्रामीण 245, संगमनेर 240, शेवगाव 203, श्रीगोंदा 188, राहुरी 178, पाथर्डी 174, कर्जत 130, कोपरगाव 123, श्रीरामपूर 118, जामखेड 109, नेवासा 95, भिंगार कन्टेंमेंट 54, अकोले 46, इतर जिल्हा 20, मिलटरी हॉस्पिटल 12 असे रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
RuZftcdgp