श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी- 01-May, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात शनिवार दि. 1 मे रोजी कोरोना उपचार चालू असताना 6 जणांचा मृत्यू ओढवला तर नव्याने 193 जण संक्रमित आले. यात 78 महिला व 115 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
घेतलेल्या 361 रॅपिड अँटीजन चाचण्यात 164 जण संक्रमित आढळले तर नगर येथून आलेल्या अहवालात 29 जण पॉझिटिव्ह आले. 129 जणांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.
आत्तापर्यंत एकूण बधितांची संख्या 6,573 झाली आहे. तर एकूण 121 जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीला 889 सक्रिय रुग्ण आहेत. कोविड केंद्रांमध्ये 535, ग्रामीण रुग्णालयात 35 व खाजगी हॉस्पिटलमध्ये 239 रुग्ण उपचार घेत आहेत.
शनिवारी श्रीगोंदा शहरात 42 जण पॉझिटिव्ह आढळले तर ग्रामीण भागात कोळगाव-18, हंगेवाडी-10, बेलवंडी बुद्रुक-10, काष्टी-9, घारगाव-8, लोणी व्यंकनाथ-7, विसापूर-6, एरंडोली-5, मढेवडगाव-5, पिंपळगाव पिसा-5, ढोरजा-4, मांडवगण-4, निमगाव खलू-3, खांडगाव-3, चांडगाव-3 तर कौठा, उक्कडगाव, म्हसे, शिरसगाव बोडखा, अधोरेवाडी, वांगदरी, देऊळगाव, सुरेगाव, कोथूळ, आनंदवाडी, हिरडगाव, पारगाव सुद्रीक येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले.
तर लिंपणगाव, माठ, चिंभळा, घुगलवडगाव, कामठी, आर्वी, खरातवाडी, चोराचीवाडी, घोगरगाव, आढळगाव, रुईखेल, टाकळी कडेवळीत, सुरोडी, घोटवी, मुंगूसगाव, आरणगाव, उखलगाव, अजनुज, ढोकराई येथे प्रत्येकी 1 रुग्ण संक्रमित आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
TpmVJGEdNZBK