अहमदनगर । वीरभूमी- 03-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात आज तब्बल 3388 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज मोठ्या प्रमाणात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 686 इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.76 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2123 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 23 हजार 712 वरून 22 हजार 390 वर आली आहे.
दिवेसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. मात्र कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 892, अकोले 41, जामखेड 153, कर्जत 204, कोपरगाव 131, नगर ग्रामीण 337, नेवासा 140, पारनेर 157, पाथर्डी 98, राहाता 398, राहुरी 151, संगमनेर 121, शेवगाव 206, श्रीगोंदा 112, श्रीरामपूर 111, कॅन्टोन्मेंट 93, इतर जिल्हा 42 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 85 हजार 204 कोरोना बाधित आढळले असून आजपर्यंत 1 लाख 60 हजार 686 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2128 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या 22390 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच कोरोना मुक्त होणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन केले जात आहे.
MkERcbghBVyD