अहमदनगर । वीरभूमी - 04-May, 2021, 12:00 AM
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा वाढला असून चार हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3963 वर पोहोचला आहे. एक दिवस जास्त तर एक दिवस कमी असा पाठशिवणीचा खेळ खेळत कोरोना जिल्ह्यात आपले पाय रोवून बसला आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहर, नगर ग्रामीणच्या पाठोपाठ राहाता, राहुरी, पानेरनेरने 300 चा आकडा पार केला आहे. तर आज शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेरनेही 200 चा आकडा पार केला आहे.
कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. काही केल्याने नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना बाढत असून प्रशासन हतबल झाले आहे. यामुळे अनेक तालुक्यात जनता कर्फ्यूच्या नावाखाली दहा दिवसाचा कडकडीत बंद पाळण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत.
आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 962, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 2160 तर अँटीजेन चाचणीत 841 असे 3963 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 622, नगर ग्रामीण 414, राहाता 319, राहुरी 317, पारनेर 309, श्रीरामपूर 297, संगमनेर 288, कोपरगाव 245, नेवासा 235, शेवगाव 217, जामखेड 174, श्रीगोंदा 147, पाथर्डी 119, इतर जिल्हा 101, भिंगार कन्टेन्मेंट 70, अकोले 50, कर्जत 27, मिलटरी हॉस्पिटल 07, इतर राज्य 05 असे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
ZKXHmeaAb