रस्त्यावरील गरजूंना अन्न वाटप करून जपली माणुसकी
पुणे । वीरभूमी- 05-May, 2021, 12:00 AM
कोरोना काळात शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे हाल होत आहेत. त्यातच रस्त्यावर राहणार्यांना कधीकधी उपासीच राहावे लागत आहे.
याचा विचार करून पुणे - औंधगाव येथील महाशक्ती जागतिक महिला लोक कल्याण असोसिएशन तर्फे तसेच एस. एम. एस. ग्रुपच्या व श्री. आर. कोठारी यांच्या मदतीने पुणे शहरातील औंध ते शिवाजी नगर पर्यंतच्या रस्त्यावरील फुले, फुगे, पिशव्या विकणारे तसेच दैनंदिन जीवनात रोजच्या हातावर पोट असलेल्या व आसरा नसणार्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत मोफत अन्न वाटप करण्याचा निर्णय घेत अंमलबजावणी सुरू केली.
रस्त्यावर राहणार्या लोकांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही अन्न वाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामागे सामाजिक बांधिलकी व गरीब लोकांबद्दल आपुलकीची भावना आहे. या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरील राहणारे लोक यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यामध्ये बोलता न येणारे मुक पशु प्राणी तसेच ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांच्या कडे व आसरा नसल्याने फिरणारे लोक यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
अशा घटकांना मदत केली जात नाही. त्यांना विचारणारे कोणी नाही. म्हणून त्यांना आपल्या परीने मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनापासून अन्न वाटप करण्यात येत असल्याची माहिती महाशक्ती असोसिएशनच्या अध्यक्षा विनया सराफ, एस.एम. एस. ग्रुपचे अध्यक्ष सोनल सराफ व या सामाजिक कार्याला मदत करणारे श्री. आर. कोठारी यांनी सांगितले.
ही देण्यात येणारी मदत लॉकडाऊन संपेर्यंत राहणार आहे. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत असून अशा उपक्रमाची सध्या वंचित व दुर्लक्षित घटकांना गरज असल्याने प्रत्येकाने आपल्यापरीने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments