वय वर्षे 65, स्कोअर 21 तरीही कोरोनामुक्त
बोधेगाव । उद्धव देशमुख- 08-May, 2021, 12:00 AM
कोरोना महामारीत सगळ्यांचीच भंबेरी उडाली असताना शेवगाव शहरातील अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकास बेडके मात्र कोरोना रुग्नांसाठी देवदूत ठरले आहेत.
शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी येथील मोहन फलके (वय 65 वर्षे) यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा स्कोर देखील 21 पर्यंत गेला. त्यातच त्यांना ब्लड प्रेशर, शुगरचा त्रास. तरीही डॉ. बेडके यांच्या उपचार पद्धतीतीने त्यांना कोरोनामुक्त केले. या महामारीत फलके यांच्यासाठी डॉ. बेडके हे देवदूतच ठरले.
शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी येथील मोहन फलके (वय 65 वर्षे) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांचा स्कोर 21 पर्यंत गेला होता. त्यातच त्यांना ब्लड प्रेशर, शुगर असा त्रासही होता. अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणी तयार होत नव्हते.
फलके कुटुंबाने त्यांना शेवगाव शहरातील अर्थव हॉस्पिटल मध्ये नेले. तेथील डॉ. विकास बेडके यांना सर्व तपासणी अहवाल दाखवले. त्यानंतर मानवता आणि डॉक्टरकीचा धर्म समोर ठेवुन डॉ. बेडके यांनी मोहन फलके यांच्यावर उपचार करण्यास तयारी दाखवत आपल्या अथर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.
वय आणि वाढलेला स्कोर पाहुन सर्व नातेवाईकच हतबल झाले होते. मात्र डॉ. विकास बेडके यांनी दाखवलेला विश्वास व त्यांनी सुरू केलेले प्रयत्न यातून फलके कुटुंब सावरले. त्याच दरम्यान पेशंट तपासताना ठेवण्यात येणारा आणि दिला जाणारा सकारात्मक दृष्टीकोन आणि औषधांचा मारा करत सदरील पेशंटला फक्त सहाच दिवसात त्यांनी कोरोनामुक्त केले.
यावेळी फलकेवाडी येथील पेशंटच्या नातेवाईकांनी डॉ. बेडके यांना धन्यवाद देत आभार मानले. कारण ज्या रुग्णांची गॅरंटी कुणी देत नव्हते, त्याला मृत्यूच्या दाढातुन बाहेर काढण्याचे काम डॉ. बेडके यांनी केले आहे.
कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर कोरोना रुग्णाला तपासणे आणि त्याला पहाणे अनेकांना ते जिक्रीचे वाटत होते. परंतु शेवगाव येथील डॉ. विकास बेडके मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांसाठी देवदुताप्रमाणे काम करत आहेत. अशाच प्रकारे इतर डॉक्टरांनी मनवता धर्म समोर ठेवून कोरोना रुग्णांवर उपचार केले तर शेवगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची फरफट थांबणार आहे. यामुळे शिवसंग्राम पक्ष अशा मानवतावादी हॉस्पिटलच्या नेहमी पाठीशी उभा असणार असल्याचा विश्वास शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी व्यक्त केला.
Comments