गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय
मुंबई । वीरभूमी- 12-May, 2021, 12:00 AM
मुंबई राज्य राखीव पोलिस बलातून (एसआरपीएफ मधून) राज्य पोलिस दलात बदलीसाठी असलेल्या अटीमध्ये राज्य शासनाने बदल केला आहे. यामध्ये बदलीसाठी आवश्यक असलेल्या सेवेची 15 वर्षाची अट शिथील करण्यात आली आहे. ती अट आता 12 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
या निर्णयामुळे राज्य राखीव बलातून राज्य पोलिस दलात येणार्या इच्छुकांचा मार्ग मोकळा होणार असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
दिवसेंदिवस राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढता कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची 15 वर्षांची अट शिथील करून 12 वर्षे करण्याचा व प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.
तसेच राज्य राखीव पोलिस बलातून राज्य पोलिस दलात बदली झाल्यानंतर पहिली 5 वर्षे जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजवावे लागत होते. या अटीमध्येही शिथीलता आणली असून यापुढे बदली नंतर जिल्हा पोलिस दलात 2 वर्षे कर्तव्य बजवावे लागणार आहे.
यानिर्णयामुळे राज्य पोलिस दलात मनुष्यबळ वाढून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
BRxSFAyVhdIQ