अहमदनगर । वीरभूमी - 13-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दोन दिवस घट झाल्यानंतर आज तिसर्या दिवशी अल्पशी वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 2846 कोरोना बाधित आढळले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यात आढळले असून त्या खालोखाल नगर ग्रामीण व शेवगावचा क्रमांक लागतो. एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा पाठशिवणीचा खेळ सुरूच असून काल ज्या तालुक्याची आकडेवारी कमी होती त्यात आज अल्पशी वाढ झाली आहे.
आज संगमनेर वगळता इतर तालुक्याची आकडेवारी 300 च्या आत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर कर्जत तालुका वगळता इतर तालुके शंभरच्या पुढे आहेत. नागरिकांनी अशीच शिस्त पाळत नियमाचे पालन केल्यास जिल्ह्यातील आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास निर्माण होत आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 495, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1287 तर अँटीजेन चाचणीत 1064 असे 2846 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 306, नगर ग्रामीण 276, शेवगाव 276, नगर शहर 260, पाथर्डी 254, श्रीगोंदा 235, श्रीरामपूर 187, राहाता 161, पारनेर 158, अकोले 127, कोपरगाव 127, नेवासा 124, राहुरी 112, जामखेड 104, कर्जत 73, इतर जिल्हा 46, भिंगार कँटोन्मेंट 15, इतर राज्य 05 असे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
vLmVBKXiG