अहमदनगर । वीरभूमी- 16-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात आज तब्बल 3296 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 7 हजार 138 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 89.42 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 2882 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 22 हजार 16 इतकी झाली आहे.
आज रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 224, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1408 आणि अँटीजेन चाचणीत 1250 रुग्ण बाधीत आढळले.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 419, अकोले 53, जामखेड 275, कर्जत 109, कोपरगाव 128, नगर ग्रामीण 337, नेवासा 212, पारनेर 195, पाथर्डी 168, राहाता 295, राहुरी 171, संगमनेर 190, शेवगाव 321, श्रीगोंदा 166, श्रीरामपूर 164, कॅन्टोन्मेंट 25, इतर जिल्हा 64 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 31 हजार 365 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 2 लाख 7 हजार 138 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2481 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 22 हजार 16 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, विनाकारण घराबाहे पडू नये, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments