बुधवारसाठी शेवगाव-पाथर्डीला मिळाले एवढे रेमडिसीवीर
बुधवारसाठी शेवगाव-पाथर्डीला मिळाले एवढे रेमडिसीवीर
पाथर्डी । वीरभूमी - 19-May, 2021, 12:00 AM
आज बुधवार दि. 19 मे रोजीसाठी शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 06 तर पाथर्डी तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 06 असे 12 रेमडिसीवीर इंजेक्शन मिळाले आहेत. रेमडिसीवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत या इंजेक्शनचे वाटप करण्यात येते आहे. त्यानुसार प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी संबधित कोविड सेंटरला रेमडिसीवीर इंजेक्शन मंजूर केले आहेत.दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी उपचारात महत्वाची भूमिका बजावणारे रेडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजात होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर याचे वितरण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे.
त्याप्रमाणे जिल्ह्यासाठी आलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचे वाटप ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड संख्यानुसार समप्रमाणात याचे वाटप करण्यात येते. त्याप्रमाणे कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता पाथर्डी तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व कोविड सेंटर करिता एकूण 06 व शेवगाव तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व कोविड सेंटर करिता एकूण 06 असे एकुण 12 रेमडिसीवीर इंजेक्शन मंजूर झाले आहेत.
पाथर्डीसाठीचे रेमडिसीवीर संगमनेर येथील बाफना मेडीकोज यांचेकडे प्राप्त झालेले आहेत. तर शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरसाठी श्रीरामपूर येथील त्रिलोक एन्टरप्रायझेस यांचेकडे प्राप्त झाले आहेत.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उपरोक्त इंजेक्शन पुढील प्रमाणे हॉस्पिटल व कोविड सेंटरकरीता वाटप करण्यात येत आहे.
त्याप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील गर्जे हॉस्पिटल 02, ज्ञानेश्वर माऊली हॉस्पिटल 02, पाथर्डी कोविड केअर सेंटर 00, तिसगाव येथील श्री कोविड केअर सेंटर 01, मिरी येथील दत्तप्रसाद कोविड केअर सेंटर 01 असे 06 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत.
तसेच शेवगाव तालुक्यातील शेवगाव येथील आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 01, अर्थव हॉस्पिटल 01, बडे हॉस्पिटल 01, साई कोविड सेंटर 01, बोधेगाव येथील बोधेश्वर कोविड सेंटर 00, शेवगाव येथील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालय 01, शेवगाव येथील फडके हॉस्पिटल 00, शेवगाव येथील साईपुष्प हॉस्पिटल 01, शेवगाव येथील डॉ. के. डी. कांबळे मेमोरियल हॉस्पिटल 00, शेवगाव शहरातील सेवा जनरल हॉस्पिटल कोविड सेंटर 00 असे 06 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत.
तरी संबधित रुग्णालयांनी वरील प्रमाणे सदर एजन्सीकडून त्वरीत इंजेक्शन ताब्यात घ्यावेत. या इंजेक्शनचा शेवगावसाठीचा पुरवठा श्रीरामपूर येथील त्रिलोक एन्टरप्रायजेस तर पाथर्डीसाठीचा पुरवठा हा संगमनेर येथील बाफना मेडीकोज या घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाला असून सदर औषधांच्या वाहतुकीसाठी 2 अंश सेल्सियस ते 8 अंश सेल्अियस या तापमानास नियंत्रण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संबधित खाजगी हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर यांना इंजेक्शनचा साठा प्राप्त करतेवेळी थर्माकॉल बॉक्स आणि कुलंट सोबत ठेवण्यात यावे.
तरी रेमडिसीवीर इंजेक्शन वाटपाबाबत काही अडचणी असल्यास पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केले आहे.
Tags :
Comments