75 किलो गांजाच्या झाडांसह आरोपीला अटक
अकोले । वीरभूमी- 20-May, 2021, 12:00 AM
अकोले तालुक्यातील मेंहदुरी गावचे शिवारातील गट क्रमांक 55/2 मध्ये उसाचे शेतात असलेली 75 किलो वजनाची ओली गांजाची हिरवेगार पाला असलेली साडे सात लाख रूपये किंमतीची झाडे बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी लागवड केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव रोडाजी उर्फ रोहीदास रामभाऊ पथवे (रा. बहिरवाडी) असे आहे. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स.फौ. जब्बीर अन्वरअली सय्यद यांनी फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे की, काल बुधवार दि. 19 मे 2021 रोजी सकाळी आरोपी रोडाजी उर्फ रोहीदास रामभाऊ पथवे (रा. बहिरवाडी) याचे मालकीचे मेंहदुरी गावचे शिवारातील गट क्रमांक 55/2 मधील उसाचे शेतात त्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता विनापरवाना बेकायदेशीर रित्या विक्री करण्याचे उद्देशाने केंद्रसरकारची बंदी असलेली नशाकारक सात लाख 50 हजार रुपये किंमतीची लहान मोठी गांजाची झाडे लावल्याची आढळून आली.
या गांजाच्या झाडाचे वजन सुमारे 75 किलो असून किंमत सुमारे साडेसात लाख रुपये किंमत आहे. रोडाजी पथवे हा गांजा वनस्पतीचे झांडाची लागवड करुन स्वतःचे ताब्यात बाळगताना मिळुन आल्याने त्याच्या विरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 161/2021 एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 20 (क)(ख)(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार करत आहे.
Comments