अहमदनगर । वीरभूमी - 20-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस जास्त झाली तर दुसर्या दिवशी कमी होत आहे. कमी-जास्त असा शिवनापाणीचा खेळ जिल्ह्यात सुरूच असून अनेक तालुक्यात पाळण्यात येणार्या जनता कर्फ्यूचाही काहीही परिणाम होतांना दिसत नाही. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 2637 कोरोना बाधित आढळले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट होत आहे तर कधी वाढ होत आहे. काल बुधवारी 3779 वर गेलेल्या आकडा आज पुन्हा कमी होऊन 2637 वर आला आहे. एकाच दिवसात तब्बल 1142 ने घट झाली आहे.
तीन दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याने दिलासा मिळत होता. मात्र काल बुधवारी मंगळवारपेक्षा 1618 बाधितांनी आकडा वाढून तो 3779 वर गेला होता. तर आज गुरुवारी यामध्ये 1142 ने घट होऊन तो आज 2637 वर आला आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा श्रीगोंदा तालुक्याचा असून तो 293 एवढा आहे. या खालोखाल संगमनेर 272, पारनेर 231, शेवगाव 216 असे कोरोना बाधित आढळले तर अकोले तालुका वगळता इतर तालुक्यातील संख्या ही शंभरच्या आत आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 221, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1088 तर अँटीजेन चाचणीत 1328 असे 2637 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली आकडेवारी- श्रीगोंदा 293, संगमनेर 272, पारनेर 231, शेवगाव 216, श्रीरामपूर 185, नगर ग्रामीण 184, पाथर्डी 176, नगर शहर 163, नेवासा 151, राहाता 135, जामखेड 130, राहुरी 122, कर्जत 118, कोपरगाव 112, अकोले 84, इतर जिल्हा 43, भिंगार कँटोन्मेंट 21, इतर राज्य 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
zogCRtPMLkcA