आज फैसला । मुख्यमंत्री ठाकरे रात्री 8.30 वा. लाईव्ह
मुंबई । वीरभूमी- 30-May, 2021, 12:00 AM
राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तसेच शनिवार व रविवार या दोन दिवशी विकेंड लॉकडाऊन सुरू आहे.
मात्र या आता 1 जून नंतर लॉकडाऊन राहणार की, उठणार याबाबतचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रविवार दि. 30 मे रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवर जनतेशी संवाद साधणार आहेत.
यामुळे आज होणार्या निर्णयाकडे लहान मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहीले आहे. राज्यात दोन टप्प्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. या दरम्यान दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊनही होता. तसेच जनता कर्फ्यूही पाळला जात होता.
यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात राहीली. आता या लॉकडाऊनची मुदत 1 जून रोजी संपत असल्याने यापुढे लॉकडाऊन वाढणार की कमी होणार याची उत्सुकता लागून राहीली आहे.
राज्यातील लॉकडाऊन टप्याटप्याने उठणार असे अपेक्षित आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याची उत्सुकता लागून राहीली आहे.
अनेक दिवसापासून राज्यातील दुकाने बंद असल्याने लहान मोठ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे अटी व शर्तीवर 1 जून नंतर दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र परिस्थिती पाहुन मुख्यमंत्री आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
TiHQuwMDAfmUN