अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात आज तब्बल 1805 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 51 हजार 801 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 95.33 टक्के इतके झाली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला असतांनाच गेल्या चोवीस तासात तब्बल 64 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 858 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 9 हजार 08 इतकी झाली आहे. आज बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 188, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 308 आणि अँटीजेन चाचणीत 362 रुग्ण बाधीत आढळले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- पाथर्डी 132, कर्जत 78, नगर ग्रामीण 61, श्रीगोंदा 60, नेवासा 59, संगमनेर 59, श्रीरामपूर 57, नगर शहर 54, राहुरी 49, पारनेर 47, कोपरगाव 39, अकोले 35, राहाता 35, शेवगाव 33, जामखेड 27, इतर जिल्हा 21 भिंगार 08, मिलटरी हॉस्पिटल 04 असे कोरोना बाधित आढळले आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 65, अकोले 54, जामखेड 08, कर्जत 35, कोपरगाव 100, नगर ग्रामीण 126, नेवासा 92, पारनेर 132, पाथर्डी 146, राहाता 82, राहुरी 142, संगमनेर 198, शेवगाव 158, श्रीगोंदा 213, श्रीरामपूर 217, कॅन्टोन्मेंट 04, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 31 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 64 हजार 145 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 2 लाख 51 हजार 801 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 3336 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 9 हजार 08 जणांवर उपचार सुरू आहेत.
अशाच प्रमाणे नगरकरांनी संयम पाळत व नियमाचे पालन करत वाटचाल केल्यास लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येकाने नियमाचे पालन करावे.
Comments