सहा तालुक्यांनी पुन्हा ओलांडली शंभरी
अहमदनगर । वीरभूमी - 03-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी बुधवारी कमी झाल्यानंतर आज गुरुवारी पुन्हा एकुण आकडेवारीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आज गुरुवारी बुधवारच्या तुलनेत 468 ने वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 1326 कोरोना बाधित आढळले. पुन्हा वाढलेल्या आकडेवारी बरोबरच चिंताही वाढली आहे.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी दरदिवशी आढळणार्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला होता. मात्र आज लगेचच हा आकडा 1326 वर गेला आहे. या आकडेवारीत पुन्हा संगमनेर सर्वोच्च स्थानावर पोहोचला असून तब्बल सहा तालुक्यांची आकडेवारी शंभरी पार गेली आहे. तर इतर तालुके दोन अंकावर स्थिर राहीले आहेत.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 268, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 686 तर अँटीजेन चाचणीत 372 असे 1326 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगमनेर 136, जामखेड 127, नगर ग्रामीण 123, पारनेर 116, श्रीगोंदा 103, अकोले 100, शेवगाव 91, पाथर्डी 87, नेवासा 77, नगर शहर 68, कोपरगाव 64, राहुरी 58, कर्जत 57, श्रीरामपूर 51, राहाता 48, इतर जिल्हा 12, भिंगार 04, मिलटरी हॉस्पिटल 02, इतर राज्य 02 असे कोरोना बाधित आढळले आहे.
एका दिवसानंतर कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्येकाने संयम पाळला तर आकडेवारी कमी होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाने विनाकारण घराबाहे पडणे टाळले पाहिजे. नियमित मास्क वापरला पाहिजे व शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे.
Comments