अहमदनगर । वीरभूमी - 07-Jun, 2021, 12:00 AM
अखेर अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात फक्त 530 कोरोना बाधित आढळले. तसेच सर्व तालुक्यांची आकडेवारी 70 च्या आत असल्याने जिल्हावाशियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील तीन महिण्यांपासून नगर जिल्ह्यची आकडेवारी झपाट्याने वाढत होती. याच दरम्यान जिल्ह्यातील शेकडो जणांचा कोरोनाने मृत्यू झाले. दरम्याने मागील चार-पाच दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊ लागल्याने दिलासा मिळत आहे. त्यातच आज अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी 530 वर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळले असून ती आकडेवारी 68 एवढी आहे. तर दुसर्या स्थानावर शेवगाव तालुका असून ही आकडेवार 66 वर आहे. तर कोपरगावची आकडेवारी एक अंकावर आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 55, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 289 तर अँटीजेन चाचणीत 186 असे 530 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगगमनेर 68, शेवगाव 66, पारनेर 58, नेवासा 49, जामखेड 41, पाथर्डी 37, श्रीगोंदा 36, नगर शहर 34, कर्जत 34, श्रीरामपूर 33, राहाता 18, राहुरी 18, नगर ग्रामीण 15, अकोले 13, कोपरगाव 05, इतर जिल्हा 04, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.
प्रत्येकाने संयम पाळत नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करणे यासह शासकीय नियमाचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करू शकू, यासाठी सर्वांनी नियम पाळावेत.
szmvVXISiWQZBH