अहमदनगर । वीरभूमी - 05-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत शुक्रवारच्या तुलनेत आज 72 ने वाढ झाली आहे. मात्र एकुण आकडेवारी हजाराच्या आतमध्ये असल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 843 कोरोना बाधित आढळले आहेत.
या आठवड्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आज शुक्रवारच्या तुलनेत थोडीशी वाढ झाली असली तरी हा आकडा हजाराच्या आत आहे. आजही श्रीगोंद्याची आकडेवारी सर्वोच्च स्थानावर असून ती 92 एवढी आहे.
त्या खालोखाल पारनेर, संगमनेर, नेवासाचा क्रमांक लागतो. मात्र सर्व तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दरदिवशी आढळणार्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला आहे. नागरिकांनी असाच संयम ठेवला तर नगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त झालेला दिसेल. मात्र यासाठी सर्वांनी नियम पाळणे महत्वाचे आहे.
आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 135, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 407 तर अँटीजेन चाचणीत 301 असे 843 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- श्रीगोंदा 92, पारनेर 88, संगमनेर 88, नेवासा 67, जामखेड 60, पाथर्डी 57, श्रीरामपूर 51, शेवगाव 49, राहाता 47, राहुरी 42, अकोले 40, कर्जत 32, कोपरगाव 30, नगर शहर 27, इतर जिल्हा 17, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळले आहे.
प्रत्येकाने संयम पाळत नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करणे यासह शासकीय नियमाचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करू शकू, यासाठी सर्वांनी नियम पाळावेत.
Comments