अहमदनगर । वीरभूमी - 08-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू असून आकडेवारी आज स्थिर आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात फक्त 534 कोरोना बाधित आढळले. तसेच सर्व तालुक्यांची आकडेवारी 60 च्या आत असल्याने जिल्हावाशियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील तीन महिण्यांपासून नगर जिल्ह्यची आकडेवारी झपाट्याने वाढत होती. मागील चार-पाच दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊ लागल्याने दिलासा मिळत आहे. त्यातच आज अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारीत सोमवारच्या तुलनेत 4 ने वाढ होऊन 534 वर आला आहे.
आज सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळले असून ती आकडेवारी 58 एवढी आहे. तर दुसर्या स्थानावर नेवासा तर तिसर्या स्थानावर शेवगाव तालुका आहे. सोमवारच्या तुलनेत आज फक्त 4 ने वाढ झाली आहे. मात्र कालच्या तुलनेत आज काही तालुक्याची आकडेवारी वाढली आहे.
आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 25, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 240 तर अँटीजेन चाचणीत 169 असे 534 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगगमनेर 58, नेवासा 57, शेवगाव 55, पाथर्डी 46, पारनेर 45, कर्जत 37, श्रीगोंदा 36, नगर ग्रामीण 29, अकोले 28, राहुरी 28, श्रीरामपूर 26, कोपरगाव 24, नगर शहर 22, राहाता 20, जामखेड 16, इतर जिल्हा 07 असे कोरोना बाधित आढळले आहे.
कोरोनाची आकडेवारी कमी झाली असली तरी कोरोना संसर्ग संपलेला नाही. यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन केले जात आहे.
XELiTPCYAjSlGg