डॉ. क्षितीज घुले यांच्या संकल्पनेतून बालमटाकळीत लसीकरण
शेवगाव । वीरभूमी- 09-Jun, 2021, 12:00 AM
शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या संकल्पनेतून शेवगाव तालुक्यात गाव तेथे लसीकरण उपक्रमातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. याच उपक्रमातंर्गत बालमटाकळी येथे ज्ञानेश्वरचे संचालक संतोष पावसे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शेवगाव तालुकाध्यक्ष अभिजीत आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
शेवगाव तालुक्यात मागील महिण्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. अशीच परिस्थिती भविष्यात येऊ नये म्हणुन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी ‘गाव तेथे लसीकरण‘ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेत तालुक्यातील जनतेचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले आहे. या उपक्रमातून तालुक्यातील शेकडो नागरिकांना गावातच लस मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
हे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. प्रत्येक नागरिकाचे लसीकरण व्हावे, यासाठी झटत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी करणे, नागरिकांचे लसीकरणाबाबत प्रबोधन करणे व लसीरकण केंद्रावर नागरिकांना घेऊन येणे, या जबाबदार्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पार पाडत आहेत.
या उपक्रमाअंतर्गत शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील नागरिकांचे आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यासाठी हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचार्यांनी नियोजित लसीकरण पूर्ण केले.
यासाठी संचालक संतोष पावसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शेवगाव तालुकाध्यक्ष अभिजीत आहेर, सिद्धांत घोरतळे, शेखर बामदळे, अक्षय गलधर, तुषार फाटे, विशाल घरगणे, दीपक सपकाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बालमटाकळी गावात सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या संकल्पनेतून लसीकरण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी डॉ. क्षितीज घुले यांचे आभार मानले आहेत.
zXCUeImo