अहमदनगर । वीरभूमी - 10-Jun, 2021, 12:00 AM
मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होऊ लागल्यानंतर समाधान व्यक्त केले जात होते. मात्र जिल्हा अनलॉक झाल्यानंतर आज प्रथमच कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात तब्बल 868 कोरोना बाधित आढळले. यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटू लागल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लॉकडाऊन उठवण्यात आले मात्र आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत बुधवारच्या तुलनेत आज मोठी वाढ झाली आहे. आज गुरुवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नेवासा पुन्हा टॉपवर आला असून ही आकडेवारी 111 वर गेली आहे. तर पाथर्डी, शेवगाव दुसर्या व तिसर्या स्थानावर आले आहेत.
कोरोना बाधितांची संख्या घटत असतांना आज पुन्हा एकदा वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा अनलॉक झाल्यानंतर आज प्रथमच जिल्ह्याची आकडेवारी 868 वर गेली आहे. नागरिकांनी केलेली गर्दी व न पाळलेले नियम यामुळेच कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढत जाईल का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 103, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 464 तर अँटीजेन चाचणीत 301 असे 868 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- नेवासा 111, पाथर्डी 95, शेवगाव 83, पारनेर 74, श्रीगोंदा 73, कोपरगाव 69, अकोले 68, संगमनेर 55, नगर ग्रामीण 43, नगर शहर 39, कर्जत 37, राहुरी 36, श्रीरामपूर 34, राहाता 22, जामखेड 11, इतर जिल्हा 11, भिंगार 06, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.
नगर जिल्हा अनलॉक झाल्यानंतर आज प्रथमच मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नागरिकांनी संयम पाळत शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
Comments