मराठा आरक्षण ः खासदार संभाजीराजे भोसले कोपर्डीत दाखल
कर्जत । वीरभूमी- 12-Jun, 2021, 12:00 AM
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने दि. 16 जून पासून मूक आंदोलनास प्रारंभ होणार आहे. तत्पुर्वी खासदार संभाजीराजे भोसले यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे येऊन निर्भयाच्या समाधीवर पुप्प वाहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Br>
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा आरक्षणप्रश्न ‘मराठा क्रांती’ मोर्चाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाला दि. 16 पासून सुरुवात होणार आहे. त्याच अनुषंगाने कोपर्डी येथूनच जिल्ह्यातील आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
Br>
खा. संभाजीराजे भोसले यांनी नुकतीच मराठा आरक्षणप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करत 16 जून पासून आंदोलनाची घोशणा केली आहे. या मूक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूर येथील राजर्षी शाहु महाराज यांच्या समाधीस्थळापासून सुरूवात होणार आहे. तसेच पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
Br>
या आंदोलनाचा एक भाग म्हणुन खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज शनिवारी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे येऊन निर्भयाच्या समाधीवर पुष्प वाहुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Br>
यावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले मराठा आरक्षणाची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांची आहे. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरवली आहे. त्याचप्रमाणे कोपर्डी येथील निर्भयाच्या हत्येतील दोषींना फाशी झालीच पाहिजे. अशी मागणी केली.
Br>
पुढे खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे म्हणत लोकप्रतिनिधींना आरक्षणप्रश्न सवाल उपस्थित केला.
Br>
खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी येथे येवून निर्भयाच्या समाधीवर पुष्प वाहुन श्रद्धांजली अर्पण केली. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई कोपर्डी पासून सुरू होणार आहे. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
FCdakYEbiGrAj