अहमदनगर । वीरभूमी- 14-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस घटत चालल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे. आज सोमवारी जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊन हा आकडा 483 वर आला आहे. यामुळे नगरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी मागील आठवड्यापासून घटत आहे. आज सोमवारीही या आकडेवारीत समाधानकारक घट झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण राहुरी तालुक्यात आढळले आहेत. मात्र हा आकडा 59 असल्याने दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची आकडेवारी 60 च्या आत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दुसर्या स्थानावर शेवगाव, तिसर्या स्थानावर कर्जत हे तालुके आहेत. तर इतर तालुके दोन अंकी आहेत.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 18, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 259 तर अँटीजेन चाचणीत 206 असे 483 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहुरी 59, शेवगाव 46, कर्जत 39, पाथर्डी 39, श्रीरामपूर 39, नेवासा 38, संगमनेर 38, पारनेर 37, श्रीगोंदा 37, जामखेड 28, अकोले 21, कोपरगाव 15, नगर शहर 15, राहाता 13, नगर ग्रामीण 11, इतर जिल्हा 05, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. नगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियम पाळले पाळले तर लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल. मात्र यासाठी नागरिकांनी संयग पाळणे महत्वाचे आहे.
Comments