भाजपा किसान मोर्चाचा इशारा । कारखाना प्रशासनाला दिले निवेदन
नेवासा । वीरभूमी- 17-Jun, 2021, 12:00 AM
तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या उसाला 2800 रुपये भाव द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी गाळप झालेल्या ऊसाचे दर राज्यामध्ये सर्वाधिक 3100 रुपये आतापर्यंत शेतकर्यांना मिळाले. यावर्षी आपल्या लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 14 लाख 51 हजार टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने आतापर्यंत 2100 रुपये भाव शेतकर्यांना अदा केला आहे. तरी शेतकर्यांची ऊस दरासंदर्भांमध्ये आपणाकडून जो भाव मिळण्याची निश्चित आहे. ती रक्कम 2800 रुपये इतकी आहे.
सन 2020-21 या हंगामचा ऊसभाव निश्चित करण्यासाठी वेळोवेळी आपणास पत्र दिले. आपणास मिटिंग आयोजित करण्यासाठी पत्रही दिले. परंतु आपण त्याची दखल न घेता ऊस हंगाम समाप्ती झालेली असताना अद्यापही अंतिम भाव जाहीर केलेला नाही. तरी या निवेदनानंतर दोन दिवसांमध्ये आपण आमच्या समवेत बैठक आयोजित करून अंतिम भाव जाहीर करावा, अन्यथा आठ दिवसानंतर सर्व शेतकर्यांसह कारखाना गेटसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आपल्या मागण्यांचे निवेदन पांडुरंग अभंग यांना देण्यात आले. निवेदनदेतेवेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी अंकुश काळे, भाऊसाहेब फुलारी, भाऊराव नगरे, अण्णासाहेब गव्हाणे, दत्तूकाका काळे, थोटे पाटील, अमोल कोलते आदी उपस्थित होते.
Comments