अहमदनगर । वीरभूमी- 20-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असतांना आज रविवारी राहाता तालुक्यात तब्बल 207 कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्याचा एकुण आकडा दुप्पटीने वाढला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 594 कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढू लागली आहे.
मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत घट होत असतांना आज रविवारी राहाता तालुक्याने संपूर्ण जिल्ह्याची चिंता वाढवली आहे. आज अचानक राहाता तालुका दोनशे पार गेला आहे. तर इतर तालुके नेहमीप्रमाणे 55 च्या आत आहेत.
या वाढलेल्या कोरोना बाधितांच्या आकड्यामुळे राहाता तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे. मात्र इतर तालुक्यातील आकडेवारी 55 च्या आत असल्याने काहीअंशी दिलासा मिळत आहे. हा वाढलेला आकडा खाजगी प्रयोगशाळा तपासणीतून आला आहे. आज राहाता तालुक्यातील खाजगी तपासणीत 182 तर रॅपिड अँटिजेन चाचणीत 25 असे 207 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 72, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 354 तर अँटीजेन चाचणीत 168 असे 594 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 207, संगमनेर 54, पाथर्डी 44, श्रीगोंदा 44, पारनेर 39, शेवगाव 37, राहुरी 28, नगर ग्रामीण 26, श्रीरामपूर 24, अकोले 22, कर्जत 16, कोपरगाव 15, जामखेड 13, नेवासा 12, नगर शहर 10, इतर जिल्हा 02, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.
जिल्ह्याचा एकुण आकडा राहाता तालुक्यामुळे वाढला आहे. मात्र इतर तालुक्यातील नागरिकांनी असाच संयम ठेवल्यास कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊन लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मदत होणार आहे.
ELgPawjxGfXrnvI