साठवणूक मर्यादेच्या निषेधार्थ आडतेबाजार असोसिएशनचा आज बंद
अहमदनगर । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
केंद्र सरकारने अचानक कडधान्ये, दाळी यावर कोणताही विचार न करता साठवणूक मर्यादा लागू केली आहे. या प्रकारामुळे देशभरातील व्यापार्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील आडते बाजार मर्चंटस् असोसिशनतर्फे मंगळवारी (6 जुलै) बंदचा इशारा दिला.
असोसिशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा म्हणाले, कडधान्ये व दाळींवर साठवणूक मर्यादेचा निर्णय घाईत घेण्यात आला. या प्रकारामुळे देशभरातील व्यापार्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक राज्यांतील कृषी उत्पन्नांचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले असून नगरमधील सर्वात मोठ्या आडतेबाजार मर्चंट असोसिएशनकडून या नव्या नियमांचा निषेध करण्याच्या हेतुने एकदिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन केले.
या बंदमध्ये शहरातील दाळमंडई, आडतेबाजार, दाणेडबरा, मार्केटयार्ड परिसरातील व्यवसायिक सहभागी होणार आहेत. तसेच कडधान्याचा व्यापार बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचेही कळवण्यात आले. जिल्ह्यातील तालुका मार्केटमधील व्यापार्यांनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच शेतकर्यांनी व ग्राहकांनी या बंदची नोंद घ्यावी.
याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपनिबंधक कार्यालयालाही कळवण्यात आले आहे, असे चोपडा यांनी सांगितले.
McKGeDRThQlaIfg