शेवगाव । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
शेवगाव इनरव्हील क्लब चा पदग्रहण समारंभ आणि कोविड योद्धयांचा सन्मान सोहळा हा उचल फाऊंडेशनच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी मावळत्या अध्यक्षा रूपालीताई तडवळकर यांनी त्यांचा पदभार हा डॉ. मनीषा लड्डा यांच्याकडे सुपूर्द केला.
तसेच सौ. पूजा धूत यांनी ट्रेझर, सौ. अनुजा लढ्ढा यांनी सेक्रेटरी, डॉ. पल्लवी घनवट यांनी आयएसओ, सौ. भाविका आर्य यांनी एडिटर म्हणून भारती बाहेती यांनी व्हाईस प्रेसिडेंट, शितल बडधे यांनी सीसी, तर डॉ. प्रीती राठी यांनी सीसीसी म्हणून पदभार स्वीकारला.
यावेळी कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. सुशील कबाडी, डॉ. प्रल्हाद पाटील, डॉ. गणेश चेके, डॉ. किरण वाघ, डॉ. श्वेता फलके, डॉ. सुयोग बाहेती, आशा वर्कर प्रमिला ढाकणे, संगीता पिसोटे, पुर्णीमा इंगळे, तसेच पो. कॉ. संगीता पालवे व पो. कॉ. मनीषा वारे यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
डॉ. गणेश चेके यांनी मनोगत व्यक्त करताना या कोरोना काळात रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांचेकडून आलेले चांगले तसेच कटू अनुभव व्यक्त केले.
इनरव्हील क्लब ने मागील वर्षी उचल फाउंडेशनचे विविध प्रश्न मार्गी लावून मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही स्विकारल्याचे डॉ. मनीषा लढ्ढा यांनी सांगितले. निवासी मुलांच्या आरोग्यविषयक सर्व उपचार मोफत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी इनरव्हील परिवाराकडून उचल फाउंडेशन च्या सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क तसेच पल्सऑक्सीमिटर, फर्स्टएड किट, हँड-सॅनिटायझर स्टॅन्ड, तसेच सर्व मुलांसाठी कपडे शैक्षणिक साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
सौ. छाया आढाव यांनी एक महिन्याचा किराणा, तसेच सौ. योगिनी पाटील, श्रीमती वसुधा सावरकर यांनी आवश्यक बाबीसाठी आर्थिक मदत केली. डॉ. पल्लवी घनवट यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करतानाच आपले मनोगतही व्यक्त केले. उचल फाउंडेशनचे कार्यकर्ते वनिता डाके, स्वाती ढवळे, सचिन खेडकर, भक्ती दहिवाळकर यांनी या सन्मानसोहळ्याचे यशस्वी नियोजन केले.
HuXOfWgxVbvqeyYR