सुसाईट नोट फॉरेन्सीक लॅबकडे; अनेकांचे घेतले जाबजबाब
पाथर्डी । वीरभूमी - 09-Jul, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी पोलिस प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
तर तपासी अधीकारी यांनी अनेकांचे जबाब घेतले असून अहवाल तयार केला आहे. तसेच आत्महत्येपुर्वी लिहिलेली सुसाईट नोट हस्ताक्षर तज्ञाकडे पाठविण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी मंगळवारी आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी डॉ. शेळके यांनी एक चिठ्ठी लिहुन त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांच्यासह तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यामुळे तपासात आत्महत्येपुर्वी लिहीलेली चिठ्ठी महत्वाची असून ही चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविण्यात येणार आहे.
मयत शेळके हे डॉक्टर असतांना त्यांनी चिठ्ठी इंग्रजीत लिहिण्याऐवजी मराठी भाषेत का लिहिली? ही चिठ्ठी त्यांनीच लिहिली की, इतर कोणी याची पडताळणी करण्यात येणार आहे.
दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचार्यांचे व प्रत्यक्षदर्शीचे जबाब पोलिसांकडून घेण्यात आले आहेत. या जबाबावरून पोलिसांनी अहवाल तयार केला असून तो वरीष्ठांकडे सादर करण्यात येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात येत आहे.
गुरुवारी सायंकाळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी करंजी येथील घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
cadpNiUXjPvSJRnE