अटक आरोपींकडून तब्बल अकरा गुन्हे उघडकीस
अहमदनगर । वीरभूमी- 09-Jul, 2021, 12:00 AM
जबरी चोर्या व इलेक्ट्रीक मोटार चोरी करणार्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व 8 मोटारी असा एकुण 1 लाख 50 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली.
दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय 23), किरण बापू घायमुक्ते (31, दोन्ही रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) व अमोल शहाजी गायकवाड (26 रा. वडगाव तांदळी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपीकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व 8 मोटारी असा 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीमधे जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रावाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही कारवाई केली.
देऊळगाव सिद्धी येथील काही व्यक्ती मोटारी चोरी करून त्या तोडून त्याची भंगारमधे विक्री करत आहे, अशी माहिती मिळाल्यावरून सानप यांचे पथक, उपनिरीक्षक जारवाल, सरोदे, लगड, ठाणगे, कदम, जाधव यांनी आरोपीना अटक केली.
EMOpHgGJrQAN