अहमदनगर । वीरभूमी- 29-Jul, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीने काल बुधवारी उच्चांक केल्यानंतर आजच्या आकडेवारीत घट झाली आहे. मात्र आजचा आकडा वाढताच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 920 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज गुरुवारी बुधवारच्या तुलनेत काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आजचा आकडा 920 वर असल्याने चिंता आहे. तसेच संगमनेर आजही पहिल्या क्रमांकावर असून आकडेवारी 125 वर आहे. तर शेवगावने आज शंभरी पार करत दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
शेवगाव पाठोपाठ श्रीगोंदा 91, पारनेर 77 अशा प्रमाणे आजची आकडेवारी आहे. कासवगतीने वाढत असणार्या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 127, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 373 तर अँटीजेन चाचणीत 420 असे 920 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 125, शेवगाव 119, श्रीगोंदा 91, पारनेर 77, राहुरी 69, जामखेड 68, नगर ग्रामीण 66, राहाता 62, कर्जत 54, कोपरगाव 40, इतर जिल्हा 30, श्रीरामपूर 27, अकोले 26, पाथर्डी 26, नेवासा 23, नगर शहर 17 असे कोरोना बाधित आढळून आले.
DJIMiNUSVnhGBOv