अहमदनगर । वीरभूमी- 01-Aug, 2021, 12:00 AM
दि. 1 ऑगस्ट 2020 ते दि. 31 जुलै 2021 या महसुली वर्षात उत्कृष्ठ काम करणार्या अहमदनगर जिल्हा महसूल विभागातील विविध संवर्गातील 23 कर्मचार्यांची गुणगौरवासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, वाहनचालक, शिपाई, कोतवाल, पोलिस पाटील या संवर्गातील कर्मचार्यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ (जिल्हा पुनर्वसन) यांच्यासह श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत रघुनाथ पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांना सन 2020-21 चा कोरोना योद्धा पुरस्कार तर संगमनेरचे प्रशांत शांताराम हासे यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आले.
अहमदनगर जिल्हा महसूल विभागाकडून जाहीर झालेल्या कर्मचार्यांची नावे - पोलीस पाटील संवर्ग ः आदेश ताराचंद साठे (नेवासा तहसील कार्यालय), राजेंद्र छगन गिते (जामखेड तहसील कार्यालय). कोतवाल संवर्ग ः भाऊसाहेब मुक्ता बोर्डे (पारनेर तहसील कार्यालय), शरद मारुती गोंधणे (शेवगाव तहसील कार्यालय), आकाश दिगंबर कर्पे (अहमदनगर तहसील कार्यालय), गणेश गंगाधर जाधव (संगमनेर तहसील कार्यालय).
शिपाई संवर्ग ः जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन शाखेतील हनुमान सखाराम बोरगे. वाहन चालक संवर्गमध्ये जिल्हाधिकारी पुनर्वसन शाखेतील वाहनचालक महादेव काशिनाथ डोंगरे यांना प्राप्त झाला आहे.
तलाठी संवर्गात अकोले येथील बाळकृष्ण विक्रम सावळे, कर्जत येथील सुजाता बाळासाहेब गुंजवटे, राहाताचे कृष्णा लक्ष्मण आरसेवार यांना जाहीर झाला आहे. महसूल सहाय्यक संवर्गात भूसंपादन शाखेतील महसूल सहाय्यक मंगेश विजय ढुमणे व कोपरगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक राहुल साहेबराव शिरसाठ यांना जाहीर झाला आहे.
मंडळाधिकारी संवर्ग ः श्रीरामपुरचे बाबासाहेब बबन गोसावी, पाथर्डीचे विश्वेश्वर ज्ञानदेव खेडकर. अव्वल कारकून संवर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील सुभाष विठोबा ठोंबरे, राहुरी तहसील कार्यालयातील श्रीमती अभया शरदराव राजवाळ, नायब तहसीलदार संवर्ग ः श्रीगोंदा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार योगिता नारायण ढोले, जिल्हा पुरवठा शाखेचे नायब तहसीलदार अभिजीत सुखदेव वांढेकर, तहसीलदार संवर्ग ः श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत रघुनाथराव पाटील.उपजिल्हाधिकारी संवर्ग ः जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी सोन्याबापू निर्मळ यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
तर विशेष पुरस्कारामध्ये सन 2021-21 चा कोरोना योद्धा पुरस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र वसंतराव बडदे यांना तर सन 2021चा आदर्श तलाठी पुरस्कार संगमनेर तहसील कार्यालयातील प्रशांत शांताराम हासे यांना जाहीर झाला आहे.
उत्कृष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल या सर्वांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदींनी पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
blXfUNaQDeoivStx