अखेर बनावट सोनेतारण प्रकरणी 159 जणांवर गुन्हा दाखल
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने प्रकरण
शेवगाव । वीरभूमी- 02-Aug, 2021, 12:00 AM
जिल्ह्यासह राज्यात बहुचर्चीत ठरलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण घोटाळा प्रकरणी अखेर आज सोमवारी तब्बल 159 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये बँकेच्या गोल्ड व्हँल्यूअरासह कर्जदारांचा समावेश आहे. अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्येनंतर वेगाने सुत्रे फिरल्यामुळे अखेर गुन्हा दाखल झाला. मात्र या अगोदरच बनावट सोने प्रकरणी गुन्हे दाखल मयत शिंदे यांचे प्राण वाचले असते, अशी हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी अर्बन बँकेचे शेवगाव शाखा व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा (वय- 54, रा. खंडोबानगर, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2017 ते 2021 या कालावधीत संबंधीत गोल्ड व्हँल्यूअर व कर्जदार यांनी वेळोवेळी संगनमत करुन बनावट दागीने खरे असल्याचे दाखवून मुल्यांकन दाखले देवून बँकेकडून कर्ज घेतले.
या कर्जदारांना वेळोवेळी नोटीसा देवूनही त्यांनी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या पिशव्यातील सोन्यांचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. वरील चार वर्षाच्या कालावधीत 159 कर्जदारांनी 364 पिशव्यात 27 किलो 351 ग्रँम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेतले होते.
यामुळे बँकेचे गोल्ड व्हँल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. जैन गल्ली, शेवगाव) याच्यासह कर्जदार बंडू माधव झिंज (रा. तळणी, ता. शेवगाव कर्ज- 1 लाख 94 हजार), गोपाल मच्छिंद्र फुंदे (रा. लाखेफळ, ता. शेवगाव, कर्ज 4 लाख 60 हजार), दिलीप भाऊसाहेब भोंडे (कर्ज- 1 लाख 51 हजार), निलेश दिलीप भोंडे (कर्ज- 5 लाख 13 हजार), राकेश दिलीप भोंडे (कर्ज 3 लाख 78 हजार), गणेश दिलीप भोंडे (सर्व रा. खालची वेस, शेवगाव, कर्ज 9 लाख 84 हजार), राहुल मारुती भालके (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज- 1 लाख 99 हजार), गणेश शालुमल भालेराव (रा. पैठण रोड, शेवगाव, कर्ज- 2 लाख 62 हजार), मंगेश रमेश महाजन (रा. जैन मल्ली, शेवगाव, कर्ज- 4 लाख 46 हजार), विलास सुधाकर महाजन (रा. ब्राम्हण गल्ली, शेवगाव, कर्ज- 4 लाख 71 हजार), बालाजी सुभाष महाजन (कर्ज-4 लाख 71 हजार), संतोष सुभाष महाजन (कर्ज- 1 लाख 65 हजार), कृष्णा भगवान महाजन (सर्व रा. जैनगल्ली, शेवगाव, कर्ज- 8 लाख 83 हजार),
रविंद्र कडुबाळ मोरे (कर्ज- 1 लाख 97 हजार 500), ज्ञानेश्वर भिमराज मोरे (दोघे रा. खुंटेफळ, ता. शेवगाव, कर्ज- 1 लाख 97 हजार 500), अमोल अर्जुन माने (रा. ब्राम्हण गल्ली, शेवगाव, कर्ज-6 लाख 43 हजार 500), वसंत सारंगधर मेरड (रा. देवटाकळी, ता. शेवगाव, कर्ज- 5 लाख 9 हजार), अक्षय संजय येळीकर (कर्ज- 6 लाख 2 हजार), अनंत संजय येळीकर (कर्ज 6 लाख 35 हजार), संजय मधुकर येळीकर (कर्ज 13 लाख 39 हजार), सुलोचना संजय येळीकर (कर्ज 4 लाख 75 हजार, सर्व रा. नेवासा रोड, शेवगाव), अशोक लक्ष्मण देवढे (रा. शास्त्री नगर, शेवगाव, कर्ज-4 लाख 68 हजार), अमृता अशोक देशमाने (कर्ज 4 लाख 68 हजार), अशोक हिरालाल देशमाने (कर्ज 6 लाख 32 हजार, दोघे रा. जैन गल्ली, शेवगाव), अशोक सूर्यभान देशमुख (कर्ज 99 हजार, रा. शहरटाकळी, ता. शेवगाव), सुनील अंगद धवले (रा. वडारगल्ली, शेवगाव, कर्ज- 1 लाख 98 हजार),
भुषण शेषराव नवले (कर्ज 1 लाख 85 हजार), शेषराव कारभारी नवले (कर्ज 10 लाख 83 हजार), नंदा शेषराव नवले (कर्ज 85 हजार, तिघे रा. शहर टाकळी, ता. शेवगाव), बंडू श्रीधर नाबदे (रा. ताजनापूर, ता. शेवगाव, कर्ज- 10 लाख 13 हजार), रजनी गणेश तांबोळी (रा. मारवाड गल्ली, शेवगाव, कर्ज 2 लाख 83 हजार), आण्णासाहेब भाऊसाहेब खैरे (रा. आव्हाणे बु., ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 90 हजार), शिवाजी रावसाहेब खंडागळे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 75 हजार), रविंद्र सुभाष खंडागळे (रा. पोलीस लाईन शेजारी, शेवगाव, कर्ज 1 लाख 16 हजार), कचरू मुकींदा खंडागळे (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव, कर्ज 99 हजार), विश्वनाथ मनोहर खरात (रा. सुसरे, ता. पाथर्डी, कर्ज 3 लाख 20 हजार), भागीनाथ गोरक्ष शिरसाट (कर्ज 1 लाख 20 हजार), कडूबाळ वसंत शिरसाट (कर्ज 1 लाख 90 हजार), सचिन रामप्पा गिरम (कर्ज 98 हजार, तिघे रा. भावीनिमगाव, ता. शेवगाव), रविंद्र अशोक निळ (रा. रावतळे, ता. शेवगाव, कर्ज 2 लाख 39 हजार), मच्छिंद्र लक्ष्मण निकम (रा. मळेगाव, ता. शेवगाव, कर्ज 9 लाख 35 हजार), शितल अमोल निकम (रा. मळेगाव, ता. शेवगाव, कर्ज 3 लाख 85 हजार 500), अमोल मच्छिंद्र निकम (रा. मळेगाव, ता. शेवगाव, कर्ज 8 लाख 10 हजार), अजित मच्छिंद्र निकम (रा. मळेगाव, ता. शेवगाव, कर्ज 7 लाख 90 हजार), शहादेव धर्मराज निकम (रा. मळेगाव, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 50 हजार, काकासाहेब सदाशिव निकम (रा. मळेगाव, ता. शेवगाव, कर्ज 5 लाख 91 हजार), शामराव भिमराय निजवे (रा. ठाकुर निमगाव, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 95 हजार), सतिष भाऊसाहेब बारगळ (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव, कर्ज 90 हजार), नितीन सीताराम मातंग (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव, कर्ज 1 लाख 86 हजार),
अमोल मच्छिंद्र बोरुडे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 97 हजार), मयुरी बाळासाहेब बर्डे (रा. हनुमान टाकळी, ता. पाथर्डी, कर्ज 3 लाख 54 हजार), रमनिक मदनलाल बंब (रा. भडाईत गल्ली, शेवगाव, कर्ज 99 हजार 500), आण्णासाहेब मोहनराव बुचकुल (रा. वडुले बु. ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 90 हजार), रविंद्र मुरलीधर औटी (रा. कुरुडगाव, ता. शेवगाव, कर्ज 95 हजार), कुंदन बाबुलाल अब्बड (रा. मारवाड गल्ली, शेवगाव, कर्ज 4 लाख 1 हजार), दीपक नवनाथ आहेर (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 4 लाख 67 हजार), अजय श्रीकांत दहिवाळकर (रा. जैन गल्ली, शेवगाव, कर्ज 4 लाख 26 हजार), चेतन मोहन दहिवाळकर (रा. जैन गल्ली, शेवगाव, कर्ज 80 हजार), रेखा श्रीकांत दहिवाळकर (रा. जैन गल्ली, शेवगाव, कर्ज 1 लाख 70 हजार), पल्लवी अजय दहिवाळकर (रा. जैनगल्ली, शेवगाव, कर्ज 2 लाख 46 हजार), संदीप अर्जुन दळवी (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 45 हजार), सचिन कडूबाळ दळवी (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 2 लाख 35 हजार), भागवत दत्तात्रय देवढे (रा. शास्त्रीनगर, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 94 हजार), मुक्ता लहू गलधर (रा. खुंटेफळ, ता. शेवगाव, कर्ज 2 लाख 39 हजार),
राहुल बाजीराव गलधर (रा. खुंटेफळ, ता. शेवगाव, कर्ज 3 लाख 55 हजार), लहू बाजीराव गलधर (रा. खुंटेफळ, ता. शेवगाव, कर्ज 4 लाख 45 हजार), नितीन सर्जेराव गायकवाड (रा. मजलेशहर, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 97 हजार), राजू जयसिंग आहेर (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, कर्ज 90 हजार), लक्ष्मण निवृत्ती आहेर (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव, कर्ज 5 लाख 90 हजार), संगीता नवनाथ आहेर (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 4 लाख 82 हजार), बंडू मच्छिंद्र रोकडे (रा. देवटाकळी, ता. शेवगाव, कर्ज 90 हजार), करणसिंग शिवसिंग रजपूत (रा. खालची वेस, शेवगाव, कर्ज 9 लाख 78 हजार), नितीन दिलीप लोढे (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 93 हजार), प्रमोद मदन लोळगे (रा. जैन गल्ली, शेवगाव, कर्ज 1 लाख 33 हजार), योगेश अशोक लोढे (रा. मजले शहर, शेवगाव, कर्ज 1 लाख 40 हजार), बिभिषण बाटकू लोढे (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 90 हजार), अशोक विठ्ठल लोझे (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 11 लाख 78 हजार), संतोष अशोक लोढे (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 4 लाख 48 हजार 500), कल्याण विठ्ठल लोढे (रा. मजले शहर, ता. शेवगाव, कर्ज 8 लाख 68 हजार), कडूबाळ साहेबराव लोढे (रा. मजलेशहर, कर्ज 3 लाख 98 हजार), पुष्पा अशोक लोढे (रा. मजले शहर, कर्ज 3 लाख 94 हजार), परसराम भाऊसाहेब लोढे (रा. मजले शहर, कर्ज 4 लाख 53 हजार), उषा कडूबाळ वाणी (रा. बर्हाणपुर, ता. शेवगाव, कर्ज 1 लाख 85 हजार), कडूबाळ आसाराम वाणी (रा. बर्हाणपूर, कर्ज 8 लाख 99 हजार),
देवीदास भानुदास यसके (रा. भावीनिमगाव, कर्ज 1 लाख 97 हजार), हरिश्चंद्र रघुनाथ शिंदे (रा. बाजारपेठ, शेवगाव, कर्ज 6 लाख 10 हजार), सतिष बंडू झिंज (रा. तळणी, कर्ज 5 लाख 2 हजार), बाळासाहेब एकनाथ ठोंबळ (रा. अंत्रे, ता. शेवगाव, कर्ज 2 लाख 91 हजार), सरस्वती बाळासाहेब ठोंबळ (रा. अंत्रे, कर्ज 1 लाख 86 हजार), अभय बाळासाहेब गोरे (रा. चापडगाव, कर्ज 1 लाख 14 हजार), ऋषीकेश राजेंद्र घाडगे (रा. खुंटेफळ, कर्ज 1 लाख 81 हजार), मीना अजय गाडेकर (रा. खुंटेफळ रोड, शेवगाव, कर्ज 1 लाख 94 हजार), अजय अरुण गाडेकर (रा. खुंटेफळ रोड, शेवगाव, कर्ज 4 लाख 29 हजार), विश्वास गोदाजी गाडे (रा. वडार गल्ली, शेवगाव, कर्ज 9 लाख 60 हजार, सुनीता विश्वास गाडे (रा. वडार गल्ली, शेवगाव, कर्ज 3 लाख 88 हजार), फारुख इस्माईल शेख (रा. सोनमियाँ वस्ती, शेवगाव, कर्ज 1 लाख 70 हजार), मदीना गुलाब शेख (रा. मजले शहर, कर्ज 81 हजार), मोईन मोहम्मद शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, कर्ज 1 लाख 55 हजार), मन्सुर सुभेदार शेख (रा. मजले शहर, कर्ज 2 लाख 82 हजार), युनुस अजमोद्दीन शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, कर्ज 1 लाख 30 हजार), बादशहा लाला शेख (रा. मजले शहर, कर्ज 4 लाख 72 हजार), इब्राहीम इस्माईल शेख (रा. ज्ञानेश्वर नगर, शेवगाव, कर्ज 3 लाख 65 हजार), लुकमान इब्राहीम शेख (रा. मजले शहर, कर्ज 1 लाख 79 हजार), समीर गुलामदस्तगीर शेख (रा. खालची वेस, शेवगाव, कर्ज 80 हजार), सायरा मोहम्मद शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, कर्ज 99 हजार), सुलेमान सुलतान शेख (रा. वडुले बु., कर्ज 5 लाख 48 हजार),
हलीमा बादशहा शेख (रा. मजले शहर, कर्ज 1 लाख 81 हजार), गुलाब लाला शेख (रा. मजले शहर, कर्ज 91 हजार), जाकीर गुलाब शेख (रा. मजले शहर, कर्ज 1 लाख 75 हजार), नफीस रियाज शेख (रा. अमरापूर, कर्ज 95 हजार), नूर बादहशा शेख (रा. नाकवाडा मोहल्ला, शेवगाव, कर्ज 3 लाख 15 हजार), योगेश आप्पासाहेब शेळके (रा. खुंटेफळ, कर्ज 8 लाख 70 हजार), अशोक आप्पासाहेब शेळके (रा. खुंटेफळ, कर्ज 3 लाख 60 हजार), शकील अहमद शेख (रा. आखेगाव, कर्ज 1 लाख 80 हजार), सय्यद सय्यद नसीर (रा. रामनगर, शेवगाव व मजले शहर, कर्ज 1 लाख 80 हजार), भानुदास सीताराम जाधव (रा. माऊलीनगर, शेवगाव, कर्ज 3 लाख 35 हजार), मनोज भानुदास जाधव (रा. माऊली नगर शेवगाव, कर्ज 5 लाख 78 हजार, चंद्रकांत वामनराव जाधव (रा. माळी गल्ली, शेवगाव, कर्ज 8 लाख 84 हजार), सखाराम रामभाऊ चोपडे (रा. बाबुजी कलेक्शन, जैन गल्ली, शेवगाव व तरवडी, ता. नेवासा, कर्ज 1 लाख 98 हजार),
प्रदीप मोहनसिंग परदेशी (रा. कोरडे वस्ती, शेवगाव, कर्ज 2 लाख 77 हजार), भास्कर गंगाधर पवार (रा. हिंगणगाव, कर्ज 5 लाख 59 हजार 500), दत्तात्रय अशोक पवार (रा. शहर टाकळी, कर्ज 1 लाख 35 हजार), राजू विनायक पगारे (रा. मजले शहर, कर्ज 94 हजार), राजेंद्र धोंडीराम गर्जे (रा. लाखेफळ, कर्ज 9 लाख 76 हजार), धोंडीराम नामदेव गर्जे (रा. लाखेफळ, कर्ज 90 हजार), संदीप ज्ञानदेव ससाणे (रा. आखेगाव, कर्ज 88 हजार), चांगदेव सुभाष सामृत (रा. बक्तरपूर, कर्ज 94 हजार), किसन काशिनाथ साबळे (रा. हनुमान वाडी, मळेगाव, कर्ज 3 लाख 13 हजार), महादेव बबन साळुंके (रा. देवटाकळी, कर्ज 1 लाख 50 हजार), चांगदेव रंगनाथ सातपुते (रा. मळेगाव, कर्ज 1 लाख 20 हजार), करण आण्णासाहेब सुपारे (रा. वडारगल्ली, शेवगाव, कर्ज 90 हजार), कृष्णा गंगाधर कावले (रा. शहरटाकळी, कर्ज 1 लाख 45 हजार), साहेबराव किसन काकडे (रा. खरडगाव, कर्ज 1 लाख 45 हजार), साहेबराव किसन काकडे (रा. खरडगाव, कर्ज 1 लाख 40 हजार), गोरक्षनाथ रंगनाथ काळे (रा. भावीनिमगाव, कर्ज 1 लाख 99 हजार), नंदा गोरक्षनाथ काळे (रा. भावनिमगाव, कर्ज 1 लाख 95 हजार), संदीप विश्वास काटकर (रा. बोडखे, कर्ज 3 लाख 25 हजार),
भाऊसाहेब रामदास कर्डिले (रा. मजले शहर, कर्ज 90 हजार), आण्णासाहेब राघु कनगरे (रा. मजले शहर, कर्ज 2 लाख 77 हजार), कानिफनाथ जगन्नाथ हेमके (रा. नागलवाडी, कर्ज 3 लाख 48 हजार), जगन्नाथ भागुजी हेमके (रा. नागलवाडी, कर्ज 1 लाख 89 हजार), किरण जनार्दन कुसळकर (रा. वडार गल्ली, शेवगाव, कर्ज 99 हजार), दिनेश विठ्ठल कुसळकर (रा. वडारगल्ली, शेवगाव, कर्ज 67 हजार), गोपाल पांडुरंग कुसळकर (रा. वडारगल्ली, शेवगाव, कर्ज 5 लाख 46 हजार), गणेश पांडुरंग कुसळकर (रा. वडारगल्ली, शेवगाव, कर्ज 1 लाख 41 हजार), अरुण भाऊसाहेब खैरे (रा. आव्हाणे खुर्द, कर्ज 1 लाख 80 हजार), मुन्नीबी कडुमियाँ पठाण (रा. मजले शहर, कर्ज 95 हजार), बिस्मील्ला अहमद पठाण (रा. मजले शहर, कर्ज 51 हजार), अमजद इब्राहिम पठाण (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, कर्ज 1 लाख 55 हजार), आसिफ अहमद पठाण (मजले शहर, कर्ज 4 लाख 37 हजार), अहमद सत्तार पठाण (रा. मजले शहर, कर्ज 4 लाख 19 हजार), इसाक शब्बीर पठाण (रा. मजले शहर, कर्ज 79 हजार),
सकीना लालभाई पठाण (रा. भगूर व मजलेशहर, कर्ज 98 हजार), अमित कडूमियाँ पठाण (रा. मजले शहर, कर्ज 4 लाख 61 हजार), अलका लक्ष्मण पाडळे (रा मजले शहर, कर्ज 90 हजार), लक्ष्मण नारायण पाडळे (रा. मजले शहर, कर्ज 5 लाख 78 हजार), संदीप विजय पाथरकर (रा. ब्राम्हणगल्ली, शेवगाव, कर्ज 1 लाख 39 हजार 500), राजेंद्र सदाशिव पानसंबळ (रा. भेंडा गट ऑफिस मागे, शेवगाव, कर्ज 1 लाख 56 हजार), प्रशांत बाप्पासाहेब घुमरे (रा. लाडजळगाव, कर्ज 52 हजार) व प्रकाश रामभाऊ गजभिव (रा. एरंडगाव, कर्ज 95 हजार) अशा 159 कर्जदारांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे सोने तारण कर्जदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून अनेकांनी आपली फसवणूक झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. गोल्ड व्हँल्युअर, त्याचे दलाल संबंधितांना गाठून माझ्या नावे अगोदरच बँकेचे सोनेतारण कर्ज आहे. मला तातडीची आर्थिक गरज असून सोने मी देतो फक्त तुमच्या नावे बँकेत ठेवा, असे सांगुन फसवणूक करत होते. मात्र हे सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ज्यांच्या नावे सोनेतारण कर्ज घेतलेले आहे. त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या गुन्हयाचा तपास करतांना गोल्ड व्हँल्युअर सोबत बँकेतील इतर कोण सहभागी होते. तसेच त्यांचे दलाल यांचाही शोध घेतल्यास अनेक तथाकथीतांचे पितळ उघडे होणार आहे.
boTEMSFlxJ