अहमदनगर । वीरभूमी- 05-Aug, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा एक दिवस कमी तर एक दिवस जास्त होत आहे. मात्र एकुण आकडेवारी कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 888 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेरने आपला उच्चांक कायम राखला आहे. तर पारनेर दुसर्या तर शेवगाव तिसर्या स्थानावर कायम राहीले आहेत. कोरोना बाधितांची एकुण आकडेवारी आज थोडीसी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 86, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 407 तर अँटीजेन चाचणीत 395 असे 888 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 120, पारनेर 110, शेवगाव 78, अकोले 67, श्रीगोंदा 70, राहुरी 59, नेवासा 58, कर्जत 56, नगर ग्रामीण 51, श्रीरामपूर 45, जामखेड 37, राहाता 37, पाथर्डी 36, नगर शहर 25, कोपरगाव 20, इतर जिल्हा 18, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
qNuRBzhvrTftgIG