अहमदनगर । वीरभूमी- 06-Aug, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या उपाय योजनांमुळे आज जिल्ह्यातील आकडेवारीत घट झाली आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात 706 कोरोना बाधित आढळले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये पारनेर तालुका पहिल्या स्थानावर आला आहे. मात्र ही आकडेवारी 75 असल्याने दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच तालुके दुसर्या स्थानावर असून आकडेवारी 75 च्या आतमध्ये आहे.
आज नगर ग्रामीण तिसर्या स्थानावर असून शेवगाव चौथ्या क्रमांकावर आहे. प्रशासनाने केलेल्या उपाय योजना नागरिकांची जागृकता यामुळे कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊ लागली आहे. असाच संयम बाळगत नागरिकांनी सतर्क रहावे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 98, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 302 तर अँटीजेन चाचणीत 306 असे 706 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 75, संगमनेर 74, नगर ग्रामीण 73, शेवगाव 73, पाथर्डी 48, नेवासा 47, कर्जत 46, राहुरी 44, जामखेड 42, नगर शहर 31, श्रीगोंदा 30, अकोले 29, श्रीरामपूर 27, कोपरगाव 23, इतर जिल्हा 11, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळून आले.
psQamxvTin