पाथर्डी । वीरभूमी- 06-Aug, 2021, 12:00 AM
चारचाकी वाहनातील तिघांनी मायंबा - सावरगाव मार्गावर (Mayamba - Savargaon road) चैतन्य दिलीप भगत या सोळा वर्षीय शाळकरी मुलाच्या गळ्यांतील सोने ओरबाडून त्यास मारहाण (Beat it with gold ornaments) केली. त्यांस वृद्धेश्वर घाटांत सोडुन दिले. घाटशिरसहुन श्रीक्षेत्र मढी येथे जाणार्या याच वाहनाने दुपारी दोनच्या सुमारास तिसगाव (ता. पाथर्डी) येथे तीन ठिकाणी अपघात केले. (Accidents at three places in Tisgaon, Tal. Pathardi.)
यामध्ये दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. घटनेनंतर गाडीतील तिघे जण पळुन गेले. अपघाताची वाहने बर्याच काळ महामार्गावरच पडुन राहीले.त्यामुळे तिहेरी मार्गावर एक किलोमीटर पर्यंत रस्ता दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नाने दीड तासानंतर वाहतूक पुर्वपदांवर आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तीन अज्ञात तरुणांनी शुक्रवारी मायंबा - सावरगाव रस्त्यावर शेताकडे जात असलेल्या चैतन्य दिलीप भगत यांस अडवून चाकुचा धाक दाखवत त्यास मारहाण केली व गळ्यांतील सोने, मोबाईल हिसकावून घेतला. ही घटना सावरगाव येथे समजताच ग्रामस्थांनी या चारचाकी वाहनाचा पाठलाग सुुुरु केला.
घाटशिरसहुन हे वाहन श्रीक्षेत्र मढी मार्गे तिसगावकडे भरधाव वेगाने आले.तिसगाव बसस्थानक परिसरांत तीन मोटारसायकल व एका चारचाकी वाहनासह एका पादचार्याला जोराची धडक देऊन अपघात घडवून आणणारे वाहन एका दुकानाला आदळून बंद पडले. त्यानंतर वाहनांतील तिघे जण पळुन गेले.
या विचित्र अपघातात गंगाधर सुर्यभान बुधवंत (रा. शिरापूर) यांच्या मोटरसायकलला या चारचाकी वाहनाची जोराची धडक बसल्याने ते या अपघातात मयत झाले. तर बाळू केदार, सचिन घोरपडे, रमेश नरवडे, प्रा.प्रकाश पंढरीनाथ लवांडे हे चार जण जखमी झाले.
यापैकी आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. अपघाताची वाहने बर्याच काळ महामार्गावर पडुन राहीले. त्यामुळे पाथर्डी, शेवगाव पैठण व नगर या तिनही मार्गावर एक किलोमीटर पर्यंत रस्ता दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली. पोलिसांचे प्रयत्नाने दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
वाहतुक सुरळीत झाल्यानंतर इमारतीचे छतावर लपलेल्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यांत घेतले. सोने ओरबाडुन मारहाण झालेल्या चैतन्य भगत याने तो तरुण मारहाण करणार्यांपैकी एक असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या तरुणामुळे इतर दोघे जण सापडतील, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी संतप्त जमावाला शांत करीत वाहतुक सुरळीत केली. उपसरपंच इलियास शेख, पं. स. सदस्य सुनील परदेशी, भाऊसाहेब लवांडे, रफीक शेख, ताहेर पठाण, पापाभाई तांबोळी, आरीफ तांबोळी आदींनी मदतकार्य केले.
OlgzdWwkXxqaI